भारताने मागील काही वर्षापासून पाकिस्तानवर दहशतवादाचा आरोप केला आहे. हे आरोप पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ते सातत्याने नाकारले आहेत. आता, एका नेत्यानेच याबाबत उघड-उघड कबुली दिली आहे. पाकिस्तानी नेते चौधरी अन्वरुल हक यांनी उघडपणे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी "लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत" भारतात हल्ले केले आहेत, असे म्हटले आहे. हक हे पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरचे माजी पंतप्रधान आहेत, त्यांनी सोमवारी अविश्वास प्रस्ताव गमावल्यानंतर राजीनामा दिला. त्यांनी PoJK विधानसभेत हे विधान केले.
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलंलाल किल्ल्यावरील हल्ल्याचा उल्लेख करणाऱ्या हकच्या कबुलीजबाबावरून १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या कार स्फोटात पाकिस्तानी दहशतवादी सहभागी असल्याचा पुरावा मिळाला आहे. यामध्ये १५ लोकांचा मृत्यू झाला होता. हल्ल्याचा सूत्रधार डॉ. उमर उन नबी हा जैश-ए-मोहम्मदशी जोडलेल्या "व्हाइट-कॉलर" दहशतवादी मॉड्यूलचा सदस्य आहे.
"जंगल्स ऑफ काश्मीर" ही टिप्पणी पहलगाम हल्ल्याचा संदर्भ
चौधरी अन्वरुल हक यांची "जंगल्स ऑफ काश्मीर" ही टिप्पणी २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भात होती, तिथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल प्रश्न विचारले आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले, यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.
सोमवारी पाकव्याप्त काश्मीर विधानसभेत त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव हरल्यानंतर अन्वरुल हक यांनी हे विधान केले. त्यांच्या भाषणाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये ते असे म्हणताना ऐकू येतात की, "जर तुम्ही बलुचिस्तानला रक्ताने भिजवत राहिलात तर आम्ही लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारतावर हल्ला करू आणि देवाच्या कृपेने, आमच्या शाहीनने तेच केले आहे. ते अजूनही मृतदेह मोजू शकत नाहीत, असंही त्या नेत्याने म्हटले आहे.
Web Summary : A Pakistani leader, Chaudhry Anwarul Haq, admitted that Pakistan-based terrorist groups attacked India, from Kashmir's forests to the Red Fort. This confession links Pakistani terrorists to past attacks, including the 2000 Delhi car bombing and the Pahalgam massacre.
Web Summary : पाकिस्तानी नेता चौधरी अनवरुल हक ने कबूल किया कि पाकिस्तान स्थित आतंकवादी संगठनों ने कश्मीर के जंगलों से लेकर लाल किले तक भारत पर हमले किए। इस कबूलनामे से पाकिस्तानी आतंकवादियों के अतीत के हमलों से संबंध जुड़ते हैं, जिसमें 2000 का दिल्ली कार बम विस्फोट और पहलगाम नरसंहार शामिल है।