'या' महिला सेलिब्रिटीला ठोठावला १५०० कोटींचा दंड; कर चोरीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 16:05 IST2021-12-21T16:05:23+5:302021-12-21T16:05:36+5:30
कर चोरीप्रकरणी महिला सेलिब्रिटीला १५०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

'या' महिला सेलिब्रिटीला ठोठावला १५०० कोटींचा दंड; कर चोरीचा आरोप
चीनमधील इंटरनेट सेलिब्रिटी (Internet Celebrity) हुआंग वेई (Huang Wei) हीला करचुकवेगिरीसाठी (Tax Evasion) 1500 कोटींहून अधिकचा दंड ठोठावण्यात आला आहे. वेईवर कडक कारवाई करत चीन सरकारने कर, विलंब शुल्क आणि दंड लवकर भरण्याचे आदेश दिले आहेत.
36 वर्षीय हुआंग वेईला चीनमध्ये लाइव्हस्ट्रीमिंगची क्विन असे म्हटले जाते. इंटरनेटवर ती विया या नावाने ओळखली जाते. ई-कॉमर्स लाइव्हस्ट्रीमर वेईचे चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर 18 दशलक्ष आणि Taobao वर 80 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, यापूर्वी 2019-2020 मध्ये वैयक्तिक उत्पन्न, कर आणि इतर गुन्हे लपवल्याबद्दल तिला मोठा दंड ठोठावण्यात आला होता. दंडाची रक्कम 1.34 अब्ज युआन होती. भारतीय चलनात ही रक्कम 16 अब्ज रुपयांच्या जवळपास आहे.
हुआंग वेईला बॅक टॅक्स, विलंब शुल्क आणि दंड म्हणून 1.34 अब्ज युआन भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती चीनच्या आयकर विभागानं दिल्याचं दक्षिण चीनच्या हांग्जो येथील कर विभागानं सांगितलं. "नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मला खेद आहे. मला देण्यात आलेली शिक्षा मी स्वीकारते," असं तिनं सोशल मीडियाद्वारे सांगितलं.