शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
6
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
7
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
8
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
9
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
10
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
11
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

भारत-चीन तणाव वाढला! युद्धाच्या तयारीला वेग द्या; शी जिनपिंग यांचे सेनेला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 13:29 IST

अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखे देश चीनच्या विरोधात एकवटले आहेत, तर दुसरीकडे तैवान, व्हिएतनामसारखे देशही चीनच्या आडेमुठी भूमिकेला चोख प्रत्युत्तर देत आहेत.

बीजिंगः गेल्या काही दिवसांपासून चीन शेजारील देशांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. शेजारील देशांच्या सीमेमध्ये घुसखोरी करणं, त्यांना धमकी देणं हा कार्यक्रम चीनकडून सातत्यानं सुरू असतो. कोरोनाच्या उत्पत्तीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चीननं इतर देशांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखे देश चीनच्या विरोधात एकवटले आहेत, तर दुसरीकडे तैवान, व्हिएतनामसारखे देशही चीनच्या आडेमुठी भूमिकेला चोख प्रत्युत्तर देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चीननं युद्धाच्या तयारीला वेग दिला आहे.चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैन्याला युद्धाच्या तयारीला वेग देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संपूर्ण ताकदीनं देशाच्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यास सांगितले आहे.  देशातील सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी)चे सरचिटणीस आणि सुमारे 20 लाख सैन्याचे प्रमुख असलेले 66 वर्षीय शी यांनी येथे चालू असलेल्या संसद अधिवेशनात पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आणि पीपल्स सशस्त्र पोलीस दलाच्या प्रतिनिधींना संबोधित करताना हे आवाहन केलं आहे. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, शी यांनी सैन्यदलाला सांगितले की, सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करा, त्याबद्दल विचार करा आणि युद्धाची सज्जता व प्रशिक्षण वाढविण्यावर भर द्या, सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितींचा त्वरित व प्रभावीपणे सामना करण्याची तयारी ठेवा. त्याचवेळी राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाचे हितांचंही संरक्षण करा. भारत आणि चीन यांच्यात वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) जवळपास 20 दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे.  अलिकडच्या काळात लडाख आणि उत्तर सिक्कीममध्ये भारत आणि चीनच्या सैन्याने त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान दोन वेगवेगळ्या ठिकाणी झटापट झाल्यानंतर दोन आठवड्यांनीही दोन्ही बाजूंचा तणाव वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सुमारे 3,500 किमी लांबीचा एलएसी अक्षरशः दोन्ही देशांमधील सीमा निर्धारित करतात.

हेही वाचा

बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात, पवार फडणवीसांवर भडकले

CoronaVirus News: आनंद महिंद्रांनी शेअर केला 'खास' फोटो; युजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया

लडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर

CoronaVirus News: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?; राणेंच्या 'त्या' विधानावर फडणवीस बोलले

टॅग्स :chinaचीनIndiaभारत