शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात Fake Newsच्या बिझनेसला अच्छे दिन, होते मोठी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 16:17 IST

सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबरच खोट्या बातम्या पसरण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. आधीच अफवा पसरण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या आपल्या समाजात तर सोशल मीडियामुळे खोट्या बातम्या झपाट्याने पसरत आहेत.

वॉशिंग्टन - सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबरच खोट्या बातम्या पसरण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. आधीच अफवा पसरण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या आपल्या समाजात तर सोशल मीडियामुळे खोट्या बातम्या झपाट्याने पसरत आहेत. दरम्यान, जगभरात सायबर गुन्हेगारांकडून फेक न्यूजला (खोट्या बातम्या) मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत असून, त्याद्वारे मोठी आर्थिक कमाई करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केल्याचे समोर आले आहे.सायबर सिक्यॉरिटीवर संशोधन करणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फेक न्यूजचे काम 10 ( सुमारे 650) रुपयांपासून सुरू होते. ऑनलाइन सिक्युरिटी फर्म्सच्या एका अहवालात खोट्या न्यूज वेबसाईट, फेक रिव्यूज आणि सोशल मीडिया बॉट्ससारख्या सेवांची माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडिया बॉट्स म्हणजे अशी ऑटोमेटेड संकेतस्थळे असतात जी वाणिज्य उत्पादने आणि सेवांच्या जाहिराती करतात. तसेच त्यांचे फायदे सोशल मीडियावर शेअर करतात. फेक न्यूजच्या बिझनेसमधील विविध मार्गामधील एक मार्ग म्हणजे खोटी मीडिया संकेतस्थळे, यामध्ये खऱ्या मीडिया संकेतस्थळांप्रमाणेच हुबेहूब अशा खोट्या वेबसाईट डिझाइन केल्या जातात. यासाठी खऱ्या संकेतस्थळाच्या नावातील स्पेलिंगमधील एखादा शब्द बदलून त्याच नावाची बेवसाइट बनवली जाते. आतापर्यंत अशा दोन हजार 800 खोट्या वेबसाइट्स उघड झाल्या आहेत.  काही सायबर गुन्हेगार रशियामधून अशा अफवा पसरवण्याच्या या धंद्याचा कारभार पाहत असतात. ते खऱी आणि वैध माहिती आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करून खोटी माहिती पसरवण्याचे काम करतात.  कुठल्याही चांगल्या बातमीप्रमाणेच खोट्या बातम्याही मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जातात. त्यांच्यावर लाइक, कमेंट केल्या जातात. त्यामुळे अशा बातम्या व्हायरल होतात.  खोट्या माहितीचा जेवढा प्रसार होतो. तेवढे सर्वसामान्य वाचकांना अशा बातमीकडे आकर्षित करणे सोपे जाते. त्यामुळे बातम्या पसरवणाऱ्याचा हेतू साध्य होण्याची शक्यता वाढते. आपल्या राजकीय विरोधकाबाबत अपप्रचार करणे असो, वादविवादाला तोंड फोडणे असो, वा नफा कमावण्याचा हेतू असो, फेक न्यूजमधून हे हेतू साध्य होतात. सध्या राजकीय प्रचारामध्ये होत असलेला फेक न्यूज साइट्सचा वापर तज्ज्ञांची चिंता वाढवत आहे. तसेच नफेखोरीसाठीही फेक न्यूजला प्रोत्साहन दिले जात आहे.    

टॅग्स :newsबातम्याCrimeगुन्हाSocial Mediaसोशल मीडिया