शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

सिंगापुरात होणार जगातील सर्वांत उंच पूर्वनिर्मित टॉवर; बांधणीचे काम मात्र सुरू आहे मलेशियात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 06:48 IST

पूर्वनिर्मित इमारतींचे सुटे भाग एका ठिकाणी तयार करून नंतर प्रत्यक्ष बांधकाम स्थळी नेऊन जुळविले जातात. प्रत्यक्ष बांधकाम स्थळी फार गर्दी न होता, बांधकाम करणे त्यामुळे शक्य होते.

नवी दिल्ली : सिंगापुरातील गर्दीच्या बुकित मेराह जिल्ह्यात जगातील सर्वाधिक उंच ‘पूर्वनिर्मित’ (प्रीफॅब्रिकेटेड) गगनचुंबी इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीची प्रत्यक्ष निर्मिती मात्र मलेशियात सुरू आहे.पूर्वनिर्मित इमारतींचे सुटे भाग एका ठिकाणी तयार करून नंतर प्रत्यक्ष बांधकाम स्थळी नेऊन जुळविले जातात. प्रत्यक्ष बांधकाम स्थळी फार गर्दी न होता, बांधकाम करणे त्यामुळे शक्य होते.सिंगापुरात उभ्या राहणाऱ्या या पूर्वनिर्मित इमारतीत १९२ मीटर (६३0 फूट) उंचीचे दोन जुळे टॉवर आहेत. अ‍ॅव्हेनू साऊथ रेसिडेन्स नावाचा हा प्रकल्प निवासी आहे. मलेशियातील सेनई येथे त्याची बांधणी सध्या केली जात आहे. षटकोणी बॉक्सच्या आकारातील मोड्यूल्स सेनई सुविधा केंद्रात बांधले जात आहेत. हे मोड्यूल्स नंतर सिंगापुरात नेऊन जुळविले जातील. ही इमारत २,४५,९७५ चौरस फूट जागेवर बांधली जात आहे. यात ८ व्यावसायिक संकुल आहेत. ५६ मजली इमारतीत १८ नभोद्याने (स्काय गार्डन) आहेत.गर्दी टाळण्यासाठी...इमारत जिथे प्रत्यक्षात उभी राहणार आहे, तिथे कोणत्याही अडथळ्याशिवाय अल्पावधीत इमारत उभी करणे या पद्धतीत शक्य होते. सध्याच्या कोविड-१९ महामारीच्या काळात निवासी परिसरात गर्दी टाळणे आवश्यक आहे. हा हेतूही या पद्धतीत साध्य होत आहे. कारण प्रत्यक्ष इमारत स्थळी फारच थोड्या लोकांची गरज यात लागते.