जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

By Admin | Updated: April 16, 2017 10:27 IST2017-04-16T08:25:30+5:302017-04-16T10:27:19+5:30

जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. इटलीच्या एमा मोरेनो या महिलेचा मृत्यू झाला.

World's oldest man's death | जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
रोम, दि. 16 - जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. इटलीच्या एमा मोरेनो या महिलेचा मृत्यू झाला. त्या 117 वर्षांच्या होत्या. जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. बीबीसीने त्यांच्या मृत्यूबाबत वृत्त दिलं आहे. 
 
एमा यांचा जन्म  29 नोव्हेंबर 1899 रोजी इटलीमध्ये झाला होता. इटलीमध्ये 90 पेक्षा जास्तवेळेस सरकार बदलतानाच्या त्या साक्षीदार होत्या. आपल्या 8 भावा-बहिणींमध्ये एमा सर्वात मोठ्या होत्या. रोज त्या तीन अंड्यांचं सेवन करायच्या त्यापैकी दोन अंडं त्या कच्च्या खायच्या. त्यांच्या आई देखील दिर्घायुषी होत्या, त्या 91 वर्ष जगल्या. 
 
आपल्या 117 वर्षांच्या जीवनात एमा यांनी खराब वैवाहिक जीवनाशिवाय, आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू, दोन विश्वयुद्ध आणि इटलीत 90 पेक्षा जास्त वेळेस बदलेलेलं सरकार पाहिलं.  

Web Title: World's oldest man's death