जगातील सर्वात वयोवृद्ध मॅगी कुत्रीचा मृत्यू

By Admin | Updated: April 19, 2016 20:17 IST2016-04-19T20:03:29+5:302016-04-19T20:17:08+5:30

ऑस्ट्रेलियात चक्क जगातल्या सर्वात वयोवृद्ध मॅगी नावाच्या 30 वर्षीय कुत्रीचा काल रात्री मृत्यू झाला आहे.

The world's oldest Maggie's bachelor's death | जगातील सर्वात वयोवृद्ध मॅगी कुत्रीचा मृत्यू

जगातील सर्वात वयोवृद्ध मॅगी कुत्रीचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत
ऑस्ट्रेलिया, दि. 19- ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात वयोवृद्ध असणा-या मॅगी नावाच्या ३० वर्षीय एका कुत्रीचा रविवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली.   

येथील स्थानिक वृत्तपत्राच्या माहितीनुसार,  मॅगी या कुत्रीचा मालक ब्रायन मॅकलॅरेन यांनी सकाळी आम्हाला ही दुखद बातमी समजल्याचं म्हटलं आहे.  ब्रायन हे दूध व्यावसायिक आहेत.

रविवारी रात्री  मॅगी ही बिछान्यावर पडून होती. ज्यावेळी ब्रायन शेतात गेले तेव्हा त्यांना ती मृतावस्थेत आढळली. मॅगीचं वय ३० होतं, ती गेल्या आठवड्यापर्यंत चांगली होती. तसेच,  मॅगी दररोज माझ्यासोबत डेअरी ते ऑफिस असा प्रवास करत असल्याची माहिती यावेळी ब्रायन यांनी दिली आहे. याचबरोबर गेल्या दोन दिवसांपूर्वीच मॅगी एक डोंगरही उतरली होती. एवढ्या वर्षांत आमची चांगली मैत्री झाली होती, असंही ब्रायन यांनी म्हटलं आहे.   

Web Title: The world's oldest Maggie's bachelor's death