जगातील सगळ्यात काळा रंग
By Admin | Updated: May 13, 2017 00:06 IST2017-05-13T00:06:52+5:302017-05-13T00:06:52+5:30
प्रत्येक रंगाला अनेक छटा असतात. काळ्या रंगालादेखील तशा छटा आहेत. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की काळ्या रंगात सगळ्यात गडद

जगातील सगळ्यात काळा रंग
प्रत्येक रंगाला अनेक छटा असतात. काळ्या रंगालादेखील तशा छटा आहेत. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की काळ्या रंगात सगळ्यात गडद म्हणजेच जगातील सगळ्यात काळा रंग वेंटाब्लॅक नावाचे मटेरियल आहे? ते एवढे काळे आहे की, ते कोणत्याही ओबडधोबड वस्तूवर किंवा मूर्तीवर ओतले की, तो पृष्ठभाग किंवा मूर्ती एकदम सपाट बनते. जगातला हा सगळ्यात काळा पदार्थ आहे. तो प्रकाशाचा ९९.९६ टक्के भाग शोषून घेतो. त्याला ब्रिटनच्या नॅनोटेक कंपनी सरे नॅनोसिस्टम्सने २०१४ मध्ये विकसित केले. कंपनीने नुकतेच त्याला स्प्रेच्या रूपात सादर केले. वेंटाब्लॅक एवढा काळा आहे की, तो ठार अंधारासारखा दिसतो. वेंटाब्लॅक हा काही पेंट नाही. तो कार्बनच्या नॅनोट्यूब्जचा वापर करून तयार झाला आहे. त्यातील प्रत्येक नॅनोट्यूबची जाडी २० नॅनोमीटरच्या बरोबरीची आहे. म्हणजे ते केसाच्या जाडीपेक्षाही ३५०० पट पातळ आहे. त्यांची लांबी १४ ते ५० मायक्रोन्सपर्यंत आहे. म्हणजे ते एक वर्गसेंटीमीटरच्या छोट्याशा जागेत एक अब्ज नॅनोट्यूब्ज मावतील.