तिसरे महायुद्ध फार दूर नाही, ते रोखण्यास मी सक्षम : ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 09:36 IST2025-02-22T09:35:47+5:302025-02-22T09:36:16+5:30
बायडेन प्रशासन आणखी एक वर्ष सत्तेत राहिले असते तर हे युद्ध अटळ होते; परंतु आता ते होणार नाही, असेही ते म्हणाले.

तिसरे महायुद्ध फार दूर नाही, ते रोखण्यास मी सक्षम : ट्रम्प
वॉशिंग्टन : तिसरे महायुद्ध आता फार दूर नाही, असा इशारा देताना अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महायुद्धाचे संकट रोखण्यात आपले नेतृत्व सक्षम असल्याचा दावा गुरुवारी मियामीमध्ये केला. बायडेन प्रशासन आणखी एक वर्ष सत्तेत राहिले असते तर हे युद्ध अटळ होते; परंतु आता ते होणार नाही, असेही ते म्हणाले.
‘एफआयआय’च्या शिखर परिषदेत ते बोलत होते. तिसऱ्या महायुद्धातून कुणालाही लाभ होणार नाही; परंतु कुणीच या युद्धापासून आता फार दूर नाही. बायडेन प्रशासन आणखी एक वर्ष राहिले असते तर आपण सारे आज तिसऱ्या महायुद्धात खेचलो गेलो असतो, असे ट्रम्प यांनी नमूद केले. अमेरिका या युद्धात कधीही सहभागी होणार नाही, उलट हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न आपण करू, असे ते म्हणाले.
रशियाला युद्ध संपवायचे आहे...
ट्रम्प म्हणाले, ‘रशिया युद्ध थांबवू इच्छित आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना हुकूमशहा संबोधून त्यांच्यावर ३५० अब्ज डॉलर खर्च करण्याच्या अमेरिकेच्या पूर्वीच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. (वृत्तसंस्था)
...ही तर लाचखोरीच
भारतात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून दिली जाणारी सुमारे १८२ कोटींची रक्कम एक प्रकारची लाचखोरीच होती, असा आराेप ट्रम्प यांनी केला. एका बैठकीत बोलताना त्यांनी मावळत्या जो बायडेन प्रशासनावर केला. ही मदत आता ट्रम्प यांनी बंद केली आहे.
विदेशी मदतीच्या आदेशाचे उल्लंघन : न्यायालय
ट्रम्प यांच्या सरकारने विदेशी मदत रोखून तात्पुरत्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाने म्हटले.
जगभरात अमेरिकेच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांसाठी किमान तात्पुरती आर्थिक मदत सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.