अमेरिकेत एकाच ठिकाणी उभी आहेत ४ हजारांपेक्षा जास्त विमानं; नेमकं काय घडतंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 06:24 PM2021-12-01T18:24:39+5:302021-12-01T18:25:00+5:30

डेविस मॉनथन एअरफोर्स बेसवर उभ्या असणाऱ्या या विमानाच्या देखभालीची जबाबदारी ३०९ एअरोस्पेस मेटेंनेस एँड रिजनरेशन ग्रुपकडे आहे

World Largest Airplane Boneyard Or Aircraft Graveyard In Arizona Stores And Regenerates in America | अमेरिकेत एकाच ठिकाणी उभी आहेत ४ हजारांपेक्षा जास्त विमानं; नेमकं काय घडतंय?

अमेरिकेत एकाच ठिकाणी उभी आहेत ४ हजारांपेक्षा जास्त विमानं; नेमकं काय घडतंय?

googlenewsNext

वॉश्गिंटन – अमेरिकेच्या एरिजोनाच्या वाळवंटात विमानाची सर्वात मोठी पार्किंग आहे. २६०० एकरमध्ये पसरलेल्या या जागेवर ४४०० पेक्षा अधिक विमानं उभी करण्यात आली आहे. बोनयार्ड नावानं प्रसिद्ध असलेल्या या शहराला विमानाचं कब्रिस्तान म्हणून ओळखलं जातं. बोनयार्डमध्ये अनेक वाहतूक विमानं, बॉम्बर, लडाऊ विमानं ठेवण्यात आली आहेत. याचठिकाणी दुसऱ्या महायुद्धातील अनेक विमानं ठेवण्यात आली आहेत.

डेविस मॉनथन एअरफोर्स बेसवर उभ्या असणाऱ्या या विमानाच्या देखभालीची जबाबदारी ३०९ एअरोस्पेस मेटेंनेस एँड रिजनरेशन ग्रुपकडे आहे. हा ग्रुप बोनायार्ड येथे उभ्या असणाऱ्या विमानांची दुरुस्ती करून पुन्हा त्यांना हवेत उड्डाण घेण्यासाठी सक्षम बनवतं. बाकी विमानांचे स्पेअर पार्ट्स काढून संपूर्ण जगाला पुरवठा करतं. या स्पेअर पार्ट्सचा वापर दुसऱ्या विमानांसाठीही केला जातो.

८०० मॅकेनिक दिवसरात्रं करतात काम

या एअरबेसचे कमांडर कर्नल जेनिफर बरनार्ड म्हणाले की, याठिकाणी ८०० पेक्षा अधिक मॅकेनिक दिवस रात्र काम करत असतात. ते जुन्या विमानांचे पुन्हा वापरण्यात येत असलेले स्पेअर पार्ट्स काढण्याचं काम करतात. कर्नल बरनार्ड हे गेल्या २५ वर्षापासून एअरक्राफ्ट मेटेंनेस ऑफिसर म्हणून इथं काम करत आहेत. सध्या ते एअरबेस कमांडर आणि ऑपरेशन इंचार्ज आहेत.

३५ बिलियन डॉलर किंमत

कर्नल जेनिफर बरनार्ड यांनी सांगितले की, या एअरबेसवर उभ्या असलेल्या विमानांची किंमत जवळपास ३४ ते ३५ बिलियन डॉलर इतकी आहे. या एअरबेसची सुरुवात १९४६ मध्ये झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर लष्काराची जुनी विमानं ठेवण्याची जागेची गरज होती. त्यावेळी एरिजोना टक्सनमध्ये डेविस मॉनथनची निवड झाली. किमान २ हजार फुटबॉल मैदानात बनलेल्या या एअरबेसमध्ये हजारो विमानं ठेवण्याची क्षमता आहे.

विमानं ठेवण्यासाठी हीच जागा का निवडली?

माहितीनुसार, या जागेवर विमानं उभी करण्यासाठी हवामान चांगले आहे. याठिकाणी गरमी आहे त्याचसोबत हल्का पाऊस आहे. परंतु हवेत धूळ नाही. त्यामुळे विमानांना जंग लागण्याचा धोका कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या एअरबेसच्या ठिकाणी जागेची कमतरता नाही. त्यामुळे नवीन येणाऱ्या विमानांनाही ठेवण्यासाठी पुरेसी जागा उपलब्ध होते. हा परिसर कॉन्क्रिंटसारखा आहे. त्यामुळे पाऊस झाला तरीही जमीन खचण्याची भीती नाही. याठिकाणी सध्या ८० प्रकाराची विमानं आणि हेलिकॉप्टर आहे. त्यात सर्वाधिक सैन्याची विमानं आहेत. ज्यात वायूसेना, नौदल, मरीनमधून रिटॉयर झाल्यानंतरची विमानं आहेत. याठिकाणी एलसी १३० हेदेखील विमान आहे. तसेच नासाचीही विमानं उभी आहेत.

Web Title: World Largest Airplane Boneyard Or Aircraft Graveyard In Arizona Stores And Regenerates in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.