WEF : कोट्यवधीत बुक झाल्या तरुणी, दावोसमधील एस्कॉर्ट एजन्सीजच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:42 IST2025-01-27T12:40:46+5:302025-01-27T12:42:37+5:30

दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी आलेल्या जगभरातील दिग्गज गुंतवणूकदारांचे काळे सत्य समोर आले आहे. एस्कॉर्ट एजन्सिजने खुलासा केला आहे की...

world economic forum davos 2025 Sex parties, prostitutes Young women booked for 9-9 crores in Davos, 3000 rich people came | WEF : कोट्यवधीत बुक झाल्या तरुणी, दावोसमधील एस्कॉर्ट एजन्सीजच्या दाव्याने खळबळ

WEF : कोट्यवधीत बुक झाल्या तरुणी, दावोसमधील एस्कॉर्ट एजन्सीजच्या दाव्याने खळबळ


दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमची पाच दिवसीय वार्षिक बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत जागतिक उद्योजकांकडून २० लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या गुंतवणुकीसाठी आश्वासन मिळवण्यास भारत यशस्वी झाला आहे. यांत 80 टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाच केंद्रीय मंत्री आणि तीन मुख्यमंत्र्यांसह या बैठकीचे भारताच्या वतीने नेतृत्व केले. मात्र, आता या बैठीसंदर्भातील एका वृत्ताने संपूर्ण जगत खळबळ उडवून दिली आहे.

सेक्स पार्ट्यांचं काळं सत्त!
डेली मेल डॉट सीओ डॉट यूके(dailymail.co.uk)मध्ये प्रसिद् झालेल्या एका वृत्तातून, दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी आलेल्या जगभरातील दिग्गज गुंतवणूकदारांचे काळे सत्य समोर आले आहे. एस्कॉर्ट एजन्सिजने खुलासा केला आहे की, या बैठकीत सेक्स पार्ट्या, वेश्या आणि ट्रान्ससेक्सुअल महिलांची प्रचंड मागणी होती. सोमवारी सुरू झालेल्या या बाठकीसाठी जगभरातील 3,000 हून अधिक उद्योगपती आणि राजकीय नेते उपस्थित होते.

सेक्स 'महफिल' -
टिट4टॅटचे प्रवक्ते अँड्रियास बर्गर यांनी मेलऑनलाइनला दिलेल्या माहितीनुसार, "डब्ल्यूईएफच्या सुरुवातीपासूनच, आम्ही दावोस आणि जवळपासच्या प्रदेशात सुमारे 300 महिला आणि ट्रान्स महिलांना बुक होताना बघितले आहे." याची तुलना २०२४ मध्ये बुक झालेल्या अंदाजे १७० महिलांशी केली जाऊ शकते.

WEF सारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये एस्कॉर्ट्सची मागणी -
लिया मॉडेल्स एस्कॉर्ट एजन्सीच्या जान आणि लिया यांनी म्हटले आहे की, WEF सारख्या मोठ्या आयोजनात सर्वसामान्यपणे एस्कॉर्ट्सची मागणी वाढते. कारण जगभरातून अनेक उच्च-श्रेणीतील पाहुणे येत असतात. यामुळे WEF साठी दावोसमध्ये एस्कॉर्ट्सचे येण्याचे मुख्य कारण पैसा कमावणे होते.

9-9 कोटी रुपयांत बुक झाल्या तरुणी...? -
या कार्यक्रमासाठी, जगभरातील श्रीमंत लोक येत असतात. जे कोणत्या ना कोणत्या कंपनीचे मालक अथवा सीईओ असतात. काही महिला त्यांच्याकडून प्रति बुकिंग £6,000 एवढे कमावतात. अनेक एजन्सीज हे मान्य करतात की, ही रक्कम श्रीमंत ग्राहकांसाठी काहीच नाही आणि त्यांचे क्लायंट महिलांच्या काही तासांच्या 'कंपनी'साठी एवढे पैसे सहज मोजतात. Titt4tat's बर्गरने म्हटले आहे की, WEF मध्ये सरासरी बुकिंग कालावधी चार तासांचा आहे. जो सरासरी प्रतितास दर आणि WEF च्या पहिल्या तीन दिवसांदरम्यान Titt4Tat वर 300 बुकिंगसह एकत्रितपणे सुमारे CHF300,000 (£270,000) एवढा होता.

Web Title: world economic forum davos 2025 Sex parties, prostitutes Young women booked for 9-9 crores in Davos, 3000 rich people came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.