शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

China Rocket out of control: चीनमुळे जग पुन्हा मोठ्या संकटात; अंतराळात पाठवलेले रॉकेट नियंत्रणाबाहेर, कुठेही कोसळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 09:00 IST

Out of control Chinese rocket is falling back to Earth: अमेरिकेच्या सरकारने गंभीर इशारा देताना म्हटले की, 21 टन वजनाचे हे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत 8 मे रोजी कधीही प्रवेश करू शकते. हे रॉकेट सध्या चार मैल प्रति सेकंद एवढा प्रचंड वेगाने पुढे जात आहे. 

चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने (Corona Virus) हाहाकार माजविलेला असताना पुन्हा एकदा चीन (China) जगासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. चीनने अंतराळात पाठविलेले रॉकेट (Rocket) अनियंत्रित झाले असून पृथ्वीवर पुन्हा प्रवेश करताना मोठा विध्वंस करण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. यामुळे जगभरातील देश चिंतेत पडले असून हे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत 8 मे रोजी प्रवेश करणार आहे. महत्वाचे म्हणजे चीनने याच रॉकेटवरून भारतातील पेटत्या चितांची खिल्ली उडविली होती. (The US Department of Defence has said it is tracking the Chinese rocket that is out of control and set to re-enter Earth's atmosphere.)

विकृत चीन! भारतातील पेटत्या चितांवरून उडविली खिल्ली; कम्युनिस्ट पार्टीची जगभर नाचक्की

अमेरिकेच्या सरकारने गंभीर इशारा देताना म्हटले की, 21 टन वजनाचे हे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत 8 मे रोजी कधीही प्रवेश करू शकते. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने वायुमंडळात पुन: प्रवेशाची तारीख जाहीर केली आहे. सध्या हे सांगणे कठीण आहे की, हे रॉकेट पृथ्वीच्या कोणत्या भागातून प्रवेश करेल आणि जगाच्या कोणत्या भागावर कोसळेल. स्पेस ट्रॅकवर या रॉकेटचे लोकेशन आणि गतीबाबत नियमित माहिती दिली जात आहे. या रॉकेटबाबत जशीजशी माहिती समोर येत आहे, अमेरिकी सरकार ती देखील जगभरासाठी उपलब्ध करत आहे. अमेरिकेने आपले सर्व सॅटेलाईट या रॉकेटला ट्रॅक करण्यासाठी कामाला लावले आहेत. अन्य सॅटेलाईट ट्रॅकरनीदेखील या 100 फूट लांब आणि 16 फूट रुंद रॉकेटबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. हे रॉकेट सध्या चार मैल प्रति सेकंद एवढा प्रचंड वेगाने पुढे जात आहे. ...तर अणुबॉम्बसारखा स्फोट अन् विध्वंस; मोठा उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यास कसं असेल चित्र?... NASA ने सांगितलं अमेरिकेचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते माईक हावर्ड यांनी सांगितले की, स्पेस कमांडच्या अंतर्गत ही घटना येत आहे. चिनी रॉकेटच्या स्थितीवर सतत नजर ठेवली जात आहे. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या काही तास आधीच हे रॉकेट कोणत्या भागातून प्रवेश करेल हे सांगता येणार आहे. 

चीनने गेल्याच आठवड्यात  स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य लाँगमार्च 5बी हे रॉकेट अंतराळात (China Rocket out of control) पाठविले होते. हे रॉकेट 29 एप्रिलला लाँच करण्यात आले होते. हे चीनचे सर्वात मोठे कॅरिअर रॉकेट आहे. गेल्या वेळी लाँच केलेल्या रॉकेटमुळे देखील धातूच्या मोठ्या मोठ्या सळ्या या रॉकेटमधून बाहेर पडल्या होत्या. त्या पृथ्वीवर कोसळल्याने आयव्हरी कोस्टच्या इमारतींना नुकसान झाले होते. काही सळ्या या आकाशात जळाल्या होत्या. आजचे हे रॉकेट ज्या गतीने पुढे जात आहे ते पाहता ते न्यूयॉर्क आणि माद्रीद किंवा दक्षिणेकडे चिली किंवा न्यूझीलंडच्या बाजुने प्रवेश करू शकते. या रॉकेटचा मार्गच अनियंत्रित झाल्याने ते कधी, कुठे वळेल हे देखील सांगता येत नाहीय, असे तज्ज्ञ जोनाथन मेगडोबल यांनी सांगितले. 

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या