लग्नानंतर पुरुषांपेक्षा महिला जास्त पाहतात 'पॉर्न क्लिप्स'

By Admin | Updated: February 8, 2017 12:39 IST2017-02-08T12:32:50+5:302017-02-08T12:39:34+5:30

संशोधकांनी शंभर विवाहीत पुरुष आणि महिलांच्या मुलाखती घेतल्या. लग्नाआधी आणि लग्नानंतर त्यांचा सेक्सकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे त्यांनी जाणून घेतले.

Women watch more than men after marriage 'porn clips' | लग्नानंतर पुरुषांपेक्षा महिला जास्त पाहतात 'पॉर्न क्लिप्स'

लग्नानंतर पुरुषांपेक्षा महिला जास्त पाहतात 'पॉर्न क्लिप्स'

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 8 - पुरुषांना लग्नाआधी पॉर्न पाहायला आवडते. तेच महिलांना लग्नानंतर पॉर्न पाहण्यामध्ये जास्त रस असतो. एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. संशोधकांनी शंभर विवाहीत पुरुष आणि महिलांच्या मुलाखती घेतल्या. लग्नाआधी आणि लग्नानंतर त्यांचा सेक्सकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे त्यांनी जाणून घेतले. 
 
9 टक्के महिलांनी लग्नाआधी पॉर्न क्लिप्स पाहत असल्याचे सांगितले. तेच लग्नानंतर पॉर्न क्लिप्स पाहणा-या महिलांचे प्रमाण 28 टक्के होते. पुरुषांमध्ये हेच प्रमाण बिलकुल उलटे आढळले. लग्नाआधी 23 टक्के पुरुष पॉर्न पाहायचे, लग्नानंतर पॉर्न पाहणा-या पुरुषांची संख्या 14 टक्के होती. सेक्सोलॉजी जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे. 
 
आणखी वाचा 
 
लग्नानंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये पॉर्न पाहण्याचे प्रमाण वाढते आणि पुरुषांमध्ये कमी होते हे महत्वाचे निरिक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. सेक्सच्या तीव्र इच्छेचा पॉर्न पाहण्याशी संबंध असतो. लग्नानंतर पुरुष सेक्सच्या कल्पना विश्वातून बाहेर येतात व त्यांचा प्रत्यक्ष शरीरसुख उपभोगण्याकडे कल जास्त वाढतो असे या अहवालात म्हटले आहे. 
 

Web Title: Women watch more than men after marriage 'porn clips'