शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

कोरोनाने सगळेच चक्र फिरले; महिला पॉर्नकडे, तर पुरुष चॉकलेट्सकडे वळले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 6:55 PM

इ्स्रायली संशोधकांचा दावा; याआधीच्या सर्वेक्षणांना छेद

तणावाच्या परिस्थितीत पुरुष पॉर्नकडे आणि महिला चॉकलेट्स वळतात, असं मानलं जातं. पण इस्रायली संशोधकांनी आता वेगळाच दावा केला आहे. कोरोना संकट काळात स्थिती नेमकी उलट आहे. पुरुष चॉकलेट्सकडे वळले आहेत. तर महिला पॉर्न आणि मद्याकडे वळल्या आहेत. संशोधकांनी बेन गुरियन विद्यापीठात या संदर्भातील संधोशनाबद्दलची कागदपत्रं जमा केली आहेत.जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. या काळात अनेकांच्या सवयी बदलल्या आहेत. त्याचा अभ्यास करण्यासाठी संशोधनकांनी सर्वेक्षण केलं. यामध्ये ११५ ब्रिटिश नागरिकांच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला. या ११५ नागरिकांमध्ये ४६ पुरुष आणि ६९ महिलांचा समावेश होता. या संशोधनातून पुढे आलेल्या निष्कर्षांची माहिती बीजीयू मार्केटिंग लॅबचे प्रमुख डॉ. इनाव फ्राईडमन यांनी दिली. 'तणावाच्या परिस्थितीत पुरुष मद्यसेवन आणि पॉर्नकडे, तर महिला गोड पदार्थांकडे वळतात, असं मानलं जातं. मात्र कोरोना संकट काळात परिस्थिती बदलली आहे. गुगल सर्चच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे,' असं त्यांनी सांगितलं.भारताचा जुना मित्र कामी येणार; कोरोनावरील लसीचे १० कोटी डोस देणार'कोरोना काळात सगळेच ताणतणावांचा सामना करत आहेत. त्यामुळे पुरुष आणि महिला तणावात असताना नेमका कशाचा आधार घेतात, याचा अभ्यास करण्यात आला. पुरुष आणि महिला तणावाखाली असताना नेमकं काय करतात, याचा अभ्यास याआधीही करण्यात आला होता. ग्राहकांचं वर्तन पाहण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आलं होतं. मात्र कोरोना काळात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील माहिती आधीच्या सर्वेक्षणातील निष्कर्षांना छेद देणारी आहे,' असं फ्राईडमन यांनी सांगितलं.काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा'तणावाखाली असताना पुरुष पॉर्न आणि मद्याचा आधार घेतात. तर महिला गोड पदार्थांकडे वळतात, असं याआधी झालेल्या सर्वेक्षणांमधून समोर आलं होतं. त्यातूनच कंपन्यांनी महिला आणि पुरुष ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून काही गृहितकं आखली होती. मात्र कोरोना काळात यामध्ये मोठा बदल झाला आहे. त्यामुळे कंपन्यांना बाजाराचा आणि ग्राहकांचा विचार करून रणनीती बदलावी लागेल,' असं फ्राईडमन म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या