पुरुषांपेक्षा महिलांना सेक्समध्ये जास्त आनंद मिळतो - स्टडी रिपोर्ट

By Admin | Updated: December 30, 2016 17:02 IST2016-12-30T16:58:59+5:302016-12-30T17:02:18+5:30

महिलांच्या तुलनेत पुरुष सेक्ससाठी जास्त उतावळे असतात. सेक्सची इच्छा, त्यासाठी पुढाकार घेऊन पुरुष आपल्या मनातल्या भावना जाहीरपणे व्यक्त करतात.

Women get more pleasure in sex than men - study reports | पुरुषांपेक्षा महिलांना सेक्समध्ये जास्त आनंद मिळतो - स्टडी रिपोर्ट

पुरुषांपेक्षा महिलांना सेक्समध्ये जास्त आनंद मिळतो - स्टडी रिपोर्ट

 ऑनलाइन लोकमत 

शिकागो, दि. 30 - महिलांच्या तुलनेत पुरुष सेक्ससाठी जास्त उतावळे असतात. सेक्सची इच्छा, त्यासाठी पुढाकार घेऊन पुरुष आपल्या मनातल्या भावना जाहीरपणे व्यक्त करतात. स्त्रिया मात्र त्यातुलनेत संयम दाखवतात. सेक्सची भावना प्रबळपणे व्यक्त करत नाहीत. 
 
सेक्ससाठी पुरुष जास्त उत्सुक्त असले तरी प्रत्यक्षात सेक्स तृप्तीमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना जास्त समाधान मिळते. अमेरिकेतील शिकागोच्या कॉनकॉरडीया विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. 
 
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरात कामोत्तेजकतेच्या चार जागा आहेत. त्यामुळे सेक्स सर्वोच्च पातळीला पोहोचते तेव्हा पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त समाधानी असतात असा निष्कर्ष या अभ्यासकांनी काढला आहे. 

Web Title: Women get more pleasure in sex than men - study reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.