चाकू घेऊन पाठलाग करणाऱ्या महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 04:25 IST2018-09-10T04:25:01+5:302018-09-10T04:25:08+5:30
ब्रिटिश पोलिसांनी महिलेला (२८) खुनाचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून रविवारी अटक केली.

चाकू घेऊन पाठलाग करणाऱ्या महिलेला अटक
लंडन : ब्रिटिश पोलिसांनी महिलेला (२८) खुनाचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून रविवारी अटक केली. बार्नस्ले या जिल्ह्यात या महिलेने त्या व्यक्तीला भोसकण्याच्या आधी त्याचा मोठा चाकू घेऊन पाठलाग केला होता.
ही महिला मानसिकदृष्ट्या आजारी आहे का याचा तपास केला जात आहे. तिने केलेल्या हल्ल्यात एक जण किरकोळ जखमी झाला. ब्रिटनमध्ये चाकूंनी हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्यामुळे अतिदक्षता पाळली जात आहे.