शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! ...अन् अवघ्या 100 रुपयांच्या केळ्यांसाठी महिलेला मोजावे लागले तब्बल 1 लाख 60 हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 15:20 IST

1 lakh 60 Thousand Rupees for Bananas : सर्वांनाच परवडतील अशा दरात केळी उपलब्ध असतात. मात्र 100 रुपयांच्या केळ्यांसाठी आता एका महिलेला तब्बल 1 लाख 60 हजार रुपये मोजावे लागल्याची घटना समोर आली आहे.

केळ्याचा समावेश पोषक तत्व असलेल्या गोष्टींमध्ये होतो. व्यायाम करणारी मंडळी रोजच केळी खातात. सर्वांनाच परवडतील अशा दरात केळी उपलब्ध असतात. मात्र 100 रुपयांच्या केळ्यांसाठी आता एका महिलेला तब्बल 1 लाख 60 हजार रुपये मोजावे लागल्याची घटना समोर आली आहे. ब्रिटनमध्ये ही घटना घडली आहे. द टेलिग्राफने दिलेल्या रिपोर्टनुसार, Cymbre Barnes असं या लंडनमध्ये राहणाऱ्या महिलेचं नाव आहे. ऑफिसला जात असताना एका रिटेल स्टोरवरून तिने केळ्याची खरेदी केली. केळ्यांची किंमत ही 1 पाउंड स्टर्लिंग म्हणजेच जवळपास 100 रुपये होती.

महिलेने घाईत असल्यामुळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून पेमेंट केलं. 1 पाउंड  स्टर्लिंगसाठी तिने ओके दाबलं असता तिच्या अकाऊंटमधून 1,602 पाउंड स्टर्लिंग म्हणजेच जवळपास 1,60,596 रुपये कमी झाले. याबाबतचा एक मेसेज देखील तिच्या फोनवर आला. दुकानात खूप गर्दी असल्याने तिने मेसेज लगेच पाहिला नाही. नंतर जेव्हा तिने फोनवर पैसे गेल्याचा मेसेज पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. मात्र तोपर्यंत उशीर झाला असून बिलिंग झालं होतं. ऑनलाईन पेमेंट करणं महिलेला भारी पडलं. 

जवळपास दीड लाख कमी झाल्याचं लक्षात येताच महिला मॅनेजरकडे गेली आणि रिफंडची मागणी केली. त्यावेळी तिला काही तांत्रिक अडचणींमुळे त्या शॉपमध्ये याचा रिफंड (Refund) मिळू शकत नाही. दुसऱ्या शाखेत गेल्यास तिला रिफंड मिळेल, असं सांगण्यात आलं. स्टोर शोधण्यासाठी तिला 45 मिनिटं चालावं लागलं. महिलेने घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा कंपनीने आपली चूक कबूल केली आणि दिलगिरी व्यक्त केली. तसेच महिलेला तिचे पैसे परत केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :LondonलंडनonlineऑनलाइनMONEYपैसा