छोटीशी चूकही या महिलेला लखपती बनवून गेली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 13:59 IST2019-05-13T13:56:19+5:302019-05-13T13:59:11+5:30
मिशीगनला राहणारी एंटोइनेट औसली यांनी एका लॉटरीमध्ये पैसे लावले होते.

छोटीशी चूकही या महिलेला लखपती बनवून गेली...
वॉशिंग्टन : कधी कधी एखादी छोटी चूक अख्खे जीवन सुधारून टाकते. मात्र, अशा संधी विरळच असतात. नाहीतर नुकसानच अधिकदा होते. मात्र, अमेरिकेतील एका महिलेला तिने केलेली चूक लखपती बनवून गेली आहे.
मिशीगनला राहणारी एंटोइनेट औसली यांनी एका लॉटरीमध्ये पैसे लावले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या मुलाची जन्मतारिख आणि वयाचा आकडा निवडला होता. धक्कादायक म्हणजे त्यांनी यावेळी त्यांच्या मुलाची जन्मतारिख चुकीची निवडली होती आणि लॉटरीमध्ये पैसे टाकल्याचेही विसरून गेली.
रात्र इतर लोकांना लॉटरीविषयी बोलताना ऐकल्यावर त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या लॉटरी अॅपवर जाऊन निकाल पाहिला आणि आनंदाने उड्याच मारल्या. औसली यांना विजेता घोषित करण्यात आले होते. यानंतर त्यांनी पाहिले की, त्यांनी त्यांच्या मुलाची जन्मतारिखच चुकीची दिली होती. यापूर्वी त्यांनी लावलेल्या लॉटरींमध्ये नेहमी त्या मुलाची जन्मतारिख देत होत्या. मात्र, यावेळी चुकीची जन्मतारिख दिली गेल्याने त्यांचे नशीब फळफळले. आणि 54 लाख रुपये जिंकले.