मागील काही दिवसांपासून आखाती देशात युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केला, आता आणखी दोन देशात युद्ध होऊ शकते. चीन आता तैवानवर हल्ला करण्याची तयारी करत आहे. चीनने तैवान सामुद्रधुनीजवळील सहा हवाई तळांवर जुन्या लढाऊ विमानांचे रूपांतर करून त्यांना हल्ला करणाऱ्या ड्रोनमध्ये तैनात केले आहे. यावरून आता जर युद्ध सुरू झाले, तर सुरुवातीचे हल्ले अत्यंत मोठे आणि धोकादायक असू शकतात असे दिसते. चीन या सुरुवातीच्या हल्ल्यांमध्ये या ड्रोनचा वापर करू शकतो.
India Lockdown Update: भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर निर्माण झालेल्या गोंधळावर केंद्राचे मोठे स्पष्टीकरण अहवालानुसार, हे ड्रोन खरे तर १९६० च्या दशकात विकसित केलेली जुनी जे-६ लढाऊ विमाने आहेत. आता त्यांच्यात बदल करून त्यांना आत्मघाती हल्ला करणाऱ्या ड्रोन सारखे बनवण्यात आले आहे. उपग्रहाद्वारे घेतलेल्या फोटोमधून फुजियान आणि ग्वांगडोंग प्रांतांमधील हवाई तळांवर त्यांची उपस्थिती दिसून आली आहे.
चीनने २०० हून अधिक जेट-ड्रोन तैनात केले आहेत. कोणत्याही संभाव्य युद्धाच्या पहिल्या टप्प्यात यांचा वापर केला जाईल. हे ड्रोन पारंपरिक यूएव्हीप्रमाणे नव्हे, तर क्रूझ क्षेपणास्त्रांप्रमाणे लक्ष्यांवर हल्ला करतील, असे तज्ञांचे मत होते.
चीन तैवानवर ड्रोनद्वारे हल्ले करणार
मिळालेल्या माहितीनुसार, चीन आधी, तैवानच्या हवाई संरक्षण प्रणालीवर ताण आणण्यासाठी आणि तिला कमकुवत करण्यासाठी मोठ्या संख्येने ड्रोन हल्ले करु शकतो. यानंतर प्रत्यक्ष, अधिक धोकादायक क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांचे हल्ले केले जातील.
चीन आधीच जगातील सर्वात मोठा व्यावसायिक ड्रोन उत्पादक आहे आणि आता लष्करी ड्रोन तंत्रज्ञानामध्ये वेगाने गुंतवणूक करत आहे. त्यांची रणनीती अधिकाधिक 'स्वार्म वॉरफेअर'वर आधारित आहे, यामध्ये मोठ्या संख्येने लहान शस्त्रे एकाच वेळी हल्ले करतात.
Web Summary : China is reportedly preparing to attack Taiwan, converting old fighter jets into attack drones. These drones, deployed at airbases, could be used in initial waves to weaken Taiwan's defenses before a larger assault.
Web Summary : चीन ताइवान पर हमला करने की तैयारी कर रहा है, पुराने लड़ाकू विमानों को ड्रोन में बदल रहा है। इन ड्रोन को हवाई अड्डों पर तैनात किया गया है, जिनका उपयोग ताइवान की रक्षा को कमजोर करने के लिए किया जा सकता है।