शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इराण-अमेरिका संघर्ष आणखी पेटणार?  "युद्ध कधी संपवायचं हे आम्ही ठरवणार, अमेरिका नाही...!"; इराणचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 10:09 IST

"युद्ध कधी संपवायचे, हे अमेरिका नाही, तर आम्ही ठरवू," असे इराणने म्हटल आहे.

मध्यपूर्वेतील तणाव सध्या तरी निवळेल असे चित्र नाही. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी इराणमधीलयुद्ध लवकरच संपेल, असे विधान केले होते. मात्र, त्यांच्या या विधानावर थेट प्रत्युत्तर देताना, "युद्ध कधी संपवायचे, हे अमेरिका नाही, तर आम्ही ठरवू," असे इराणने म्हटल आहे.

इराण थेटच बोलला - इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आयआरजीसीने म्हटले आहे की, "युद्धाचा शेवट आम्ही ठरवू. या भागातील राजकीय समीकरणे आणि भविष्यातील परिस्थिती आता आमच्या सैन्याच्या हातात आहे. अमेरिकन सैन्य हे युद्ध संपवू शकत नाही." इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे या भागातील लष्करी वर्चस्वाची लढाई आता अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते डोनल्ड ट्रम्प -यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते, "इराणविरुद्धचे युद्ध हे अत्यंत कमी कालावधीचे असू शकते. पण, जर इस्लामिक रिपब्लिकने जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा आणला, तर ही लढाई अधिक भीषण होऊ शकते. असा इशाराही त्यांनी दिला होता. यानंतर इराणची ही प्रतिक्रिया आली आहे.

जर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील तेल पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला, तर... -मियांमी येथील आपल्या गोल्फ क्लबमध्ये रिपब्लिकन खासदारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, "काही अनिष्ट गोष्टींपासून सुटका मिळवण्यासाठी आपण मध्यपूर्वेचा एक छोटासा दौरा केला. तो अल्पकाळाचाच असेल, असे मला वाटते." यानंतर त्यांनी सोशल मीडियावरही एक पोस्ट केली होती. त्यात, "जर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील तेल पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका त्यांच्यावर आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांपेक्षा वीस पटीने अधिक तीव्र कारवाई अथवा हल्ले करेल," असा इशारा देण्यात आला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Warns US: We Decide When War Ends, Not You!

Web Summary : Iran rebuffs Trump's claim of a quick end to conflict, asserting control over war's conclusion. IRGC declares military dominance, warning of intensified conflict if Iran's oil supply is blocked. Trump threatened a 20-fold stronger response.
टॅग्स :IranइराणWarयुद्धAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प