शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 17:12 IST

इराणच्या तीन प्रमुख अणुकेंद्रांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर काही तासांतच अराघची यांनी ही माहिती दिली...

इस्रायल-इराण युद्धात आता थेट अमेरिकेने एन्ट्री केली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यांनंतर, पश्चिम आशियातील भू-राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे रविवारी दुपारी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी मॉस्कोला रवाना होत आहेत. मध्य पूर्वेतील वाढलेल्या तणावादरम्यान ते उद्या पुतिन यांची भेट घेतील. इराणच्या तीन प्रमुख अणुकेंद्रांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर काही तासांतच अराघची यांनी ही माहिती दिली. 

अराघची म्हणाल, "रशिया हा इराणचा मित्र आहे. आम्ही नेहमीच एकमेकांशी चर्चा करत असतो. मी आज दुपारी मॉस्को येथे जात असून उद्या सकाळी रशियन राष्ट्रपतींसोबत गंभीर चर्चा करेन." त्यांनी ही माहिती इस्तांबुल येथे OIC (इस्लामिक सहकार्य संघटना) शिखर परिषदेदरम्यान आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.

अराघची-पुतिन यांच्या भेटीसंदर्भात चर्चांना उधाण -अराघची आणि पुतिन यांच्या भेटीसंदर्भात चर्चांना उधाण आले आहे. आता इराण अमेरिकेविरोध राजकीय आणि लष्करी रणनीतीत रशियाची मदत घेऊ शकतो. तत्पूर्वी, रशियाने इराणवर केलेल्या कारवाईसंदर्भात रशियाने नाराजीही व्यक्त केली होती.

"आता राजनैतिक चर्चेला काही अर्थ नाही" -  "अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर आता राजनैतिक चर्चेला काही अर्थ उरला नाही. कुटनीतिचा रस्ता कायम खुला ठेवायचा हे जरी योग्य असले तरी आता ती परिस्थिती राहिलेली नाही, असे अब्बास अराघची यांनी म्हटले आहे. जेव्हा अमेरिकेसोबत चर्चा सुरु होती तेव्हा इस्रायलने आमच्यावर हल्ला केला. तिथेच कुटनीती संपली. यानंतर आम्ही युरोपिय देशांशी चर्चा करत असताना अमेरिकेने हल्ला केला आणि ती प्रक्रिया देखील संपवली. आता,  एवढे सर्व होऊनही, इराणने चर्चेच्या मार्गावर परतावे, असे युरोप कसे म्हणू शकतो? असा सवालही अराघची यांनी केला. आम्ही जर चर्चा सोडलीच नाही तर परतायचे कसे? ती बंद करायचे आम्ही तर ठरविले नाही. आमच्यावरच हल्ले करण्यात आले आहेत," असा आरोप अराघची यांनी केला आहे. 

 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन