माद्रिद : अमेरिका, इस्रायलने इराणविरोधात केलेल्या लष्करी कारवाईत आम्ही सहभागी होणार नाही असे स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी बुधवारी सांगितले. इराणवरील हल्ल्यांसाठी स्पेनमधील संयुक्त लष्करी तळांचा वापर करू देण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे त्या देशासोबतचा व्यापार बंद करण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला आम्ही जुमानणार नाही, असेही सांचेझ यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, जगासाठी हानिकारक ठरणाऱ्या तसेच आमची मूल्ये, हितसंबंधांच्या विरोधात असलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये आम्ही सहभागी होणार नाही. स्पेन हा युरोपियन युनियनचा सदस्य असल्याने त्या देशाशी ट्रम्प प्रत्यक्षात व्यापार कसा बंद करतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हितांचे रक्षण करणार : युरोपियन युनियनयुरोपियन युनियनने म्हटले आहे की, अमेरिकेबरोबर व्यापारी संबंध नीट राखतानाच आमच्या हितांचेही रक्षण केले जाईल. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी सुरू केलेल्या आयात शुल्क मोहिमेमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेनंतर युरोपियन युनियनने अमेरिकेशी व्यापार करार केला होता. स्पेनचे पंतप्रधान सांचेझ म्हणाले की, इराणवरील हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेत मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशीच स्थिती यापूर्वी अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तानमध्ये केलेल्या लष्करी कारवाईमुळे झाली होती.
आंतरराष्ट्रीय कायद्यांची पायमल्ली करून लष्करी कारवाई - कॅनडाकॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी बुधवारी सांगितले की, इराण युद्धामुळे जागतिक व्यवस्था विस्कळीत होते आहे. काही देश आंतरराष्ट्रीय नियम व कायद्यांची पायमल्ली करून लष्करी कारवाई केली आहे. सिडनी येथील लोवी इन्स्टिट्यूटमध्ये एका समारंभात त्यांनी सांगितले की, सर्व नियम झुगारून केलेल्या लष्करी कारवाईचे परिणाम साऱ्या जगाला भोगावे लागत आहेत. इराणने अण्वस्त्रनिर्मिती करून आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेला धोका निर्माण करू नये यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना कॅनडाचा पाठिंबा असल्याचेही कार्नी यांनी सांगितले.
Web Summary : Spain will not participate in military action against Iran, Prime Minister Sánchez affirmed, rejecting Trump's trade threats. European Union vows to protect its interests amid US trade tensions. Canada criticizes military actions undermining international laws, while supporting efforts to prevent Iran's nuclear weapons development.
Web Summary : स्पेन ईरान के खिलाफ सैन्य कार्रवाई में भाग नहीं लेगा, प्रधान मंत्री सांचेज़ ने पुष्टि की, ट्रम्प के व्यापार खतरों को खारिज कर दिया। यूरोपीय संघ ने अमेरिकी व्यापार तनाव के बीच अपने हितों की रक्षा करने का संकल्प लिया। कनाडा ने अंतर्राष्ट्रीय कानूनों को कमजोर करने वाली सैन्य कार्रवाइयों की आलोचना की।