रशिया आणि युक्रेनमध्ये मागील तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. अनेक देशांनी हस्तक्षेप करूनही हा संघर्ष थांबलेला नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युद्ध थांबवण्यासाठी आवाहने केली गेली. पण, उपयोग झाला नाही. हे युद्ध थांबवण्यासाठी आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. हे युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन हे प्रत्यक्ष भेटणार आहेत. त्यापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांनी तडजोड न करण्याची रोखठोक भूमिका घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे पुढील आठवड्यात भेटणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी दोन्ही नेते अमेरिकेतली अलास्का राज्यात भेटणार आहेत. या भेटीचा उद्देश युद्ध कसे थांबवता येईल, हा असणार आहे. ट्रम्प यांनी शुक्रवारीच (८ ऑगस्ट) यांची सोशल मीडियावरून माहिती दिली.
ट्रम्प-पुतीन भेटीआधी झेलेन्स्की काय म्हणाले?
रशियाचे अध्यक्ष झेलेन्स्की या भेटीबद्दल बोलताना म्हणाले की, "युक्रेनच्या संविधानाचे उल्लंघन केले जाणार नाही. कब्जा करण्यात आलेली जमीन युक्रेन कधीही भेट म्हणून देणार नाही. त्याबाबत तडजोड स्विकारली जाणार नाही."
"युक्रेनच्या सहमतीशिवाय घेण्यात आलेल्या कोणताही निर्णय हा शांतता प्रस्थापित करण्याच्या विरोधात असेल. यातून शांतता प्रस्थापित होणार नाही. शस्त्रसंधी परिणामकारक ठरणार नाही. आम्हाला खरी शांतता हवी आहे. तात्पुरती शांतता नको आहे", असेही झेलेन्स्की म्हणाले.
रशियाने २०१४ मध्ये युक्रेनच्या चार भूप्रदेशावर कब्जा केला होता. हे भूप्रदेश पुतीन रशियाचा भाग मानतात. लुहान्स्क, दोनेत्स्क, झापोरिज्जिया, खरसान हे भूप्रदेश आहेत. दरम्यान, ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनले तेव्हापासून हे युद्ध थांबवण्याचे प्रयत्न करत आहेत. पुतीन यांच्यावर दबाव आणवा, यासाठी त्यांनी चीन,भारत आणि ब्राझीलवरही दबाव टाकला होता.