शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अमेरिकेत मास्टर्स डिग्री करताना काम करण्याची परवानगी असते का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 7:19 PM

अमेरिकेत शिक्षण घेत असताना नोकरी करता येते का?

प्रश्न- मला अमेरिकेत मास्टर्स डिग्री पूर्ण करायची  आहे. हे शिक्षण घेत असताना स्टुडंट (एफ-1) व्हिसावर मला नोकरी करायची परवानगी असेल का?उत्तर- अमेरिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्राथमिक हेतू अभ्यास असायला हवा. मात्र एफ-1 व्हिसा असल्यावर तुम्ही कामदेखील करू शकता. मात्र त्यासाठी तुम्ही डेजिगनेटेड स्कूल ऑफिशियलशी (डीएसओ) संपर्क साधायला हवा. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत अशी व्यक्ती असते. याबद्दलची अतिरिक्त माहिती https://www.ice.gov/sevis/employment या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एफ-1 विद्यार्थी म्हणून तुम्ही कॅम्पसमधून मिळालेली नोकरीची संधी स्वीकारू शकता. तुमचं शिक्षण सुरू असताना आठवड्याला 20 तास तुम्ही काम करू शकता. याशिवाय सुट्टी असताना पूर्ण वेळ काम करण्याची परवानगी असते. तुमच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पहिल्याच वर्षात तुम्हाला कॅम्पस एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळते. कॅम्पस एम्प्लॉयमेंटचा अर्थ तुमच्या शैक्षणिक संस्थेत किंवा तुमच्या शैक्षणिक संस्थेशी करारबद्ध असलेल्या कंपनीत काम करणं असा होतो. विद्यार्थी त्यांच्या संस्थेशी शैक्षणिकदृष्ट्या संलग्न असलेल्या इतर संस्थांमध्येही (उदाहरणार्थ, संशोधन प्रयोगशाळा) काम करू शकतात. एखादी नोकरी ऑन-कॅम्पस एम्प्लॉयमेंटमध्ये बसते का, याची पडताळणी डीएसओंकडून करुन घ्या. पहिल्या शैक्षणिक वर्षानंतर तुम्ही ऑफ-कॅम्पस एम्प्लॉयमेंटसाठी पात्र ठरता. ऑफ-कॅम्पस एम्प्लॉयमेंटचे दोन प्रकार आहेत. करिक्युलर प्रॅक्टिकल ट्रेनिंग (सीपीटी) ही इंटर्नशिप असते. सीपीटी तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग असते. अनेकदा याचे गुण मिळत असल्यानं तुम्हाला शैक्षणिकदृष्ट्या फायदा होतो. ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग अंतर्गत येणारी नोकरी तुमच्या अभ्यासाशी संबंधित असते. उदाहरणार्थ, कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी ओपीटीच्या अंतर्गत एखाद्या टेक्नॉलॉजी कंपनीत काम करू शकतो. परदेशातून अमेरिकेत आलेले अनेक विद्यार्थी त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच ओपीटीमध्ये सहभागी होतात. 12 महिन्यांसाठी ओपीटी दिलं जातं. यानंतर तुमच्या शैक्षणिक क्षेत्रानुसार, तुम्ही मुदतवाढीसाठी अर्ज करू शकता. सीपीटी किंवा ओपीटीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला डीएसओंकडून परवानगी घ्यावी लागते. याशिवाय यूएस सिटीझनशिप आणि इमिग्रेशन सेवेची परवानगीदेखील गरजेची असते.एफ-1 व्हिसा धारक विद्यार्थ्यांना नोकरीसंदर्भातील नियमांची माहिती अनेक माध्यमांतून मिळू शकते. तुमच्या शैक्षणिक संस्थेचे डीएसओ आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचं कार्यालय यांच्याकडून या संदर्भातील प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. याबद्दलची माहिती https://studyinthestates.dhs.gov/students या संकेतस्थळावर मिळू शकते.  

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा