शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनला मिळणार पहिली मुस्लिम महिला पंतप्रधान? कोण आहेत शबाना महमूद, ज्यांच्या नावाची सुरू आहे चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 19:35 IST

ब्रिटनच्या पहिल्या मुस्लिम महिला पंतप्रधान म्हणून शबाना महमूद यांचे नाव आघाडीवर आले आहे.

ब्रिटनच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू असून पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. लेबर पार्टीमध्येच स्टारमर यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवले जात असताना, ब्रिटनच्या पहिल्या मुस्लिम महिला पंतप्रधान म्हणून शबाना महमूद यांचे नाव आघाडीवर आले आहे. शबाना सध्या ब्रिटनच्या गृहमंत्री असून, त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे ब्रिटनच्या राजकारणात नवा इतिहास रचला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'एपस्टीन फाईल्स'ने वाढवले कीर स्टारमर यांचे टेन्शन

ब्रिटनमध्ये लेबर पार्टीचे सरकार असून संसदेत ६५० पैकी ४०४ जागांसह त्यांचे वर्चस्व आहे. मात्र, अमेरिकेत सार्वजनिक झालेल्या 'एपस्टीन फाईल्स'मुळे स्टारमर अडचणीत आले आहेत. त्यांनी नियुक्त केलेले राजदूत पीटर मंडेलसन यांचे नाव या फाईल्समध्ये आल्याने पक्षातील खासदार संतापले आहेत. स्टारमर यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर शबाना महमूद यांचे नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत आले आहे.

कोण आहेत शबाना महमूद?

४५ वर्षीय शबाना महमूद या पेशाने बॅरिस्टर असून लेबर पार्टीतील एक प्रभावशाली वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. १९८० मध्ये बर्मिंगहॅममध्ये जन्मलेल्या शबाना यांनी २००२ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. शबाना यांचे कुटुंब मूळचे पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूरचे आहे. २०१० मध्ये त्या पहिल्यांदा संसदेत पोहोचल्या. ब्रिटनच्या पहिल्या तीन मुस्लिम महिला खासदारांमध्ये त्यांचा समावेश होतो. २०२५ मध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

कडक धोरणांमुळे 'लेडी आयर्न'ची ओळख

शबाना महमूद यांची ओळख एकीकडे मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व करणारी नेत्या म्हणून आहे, तर दुसरीकडे त्यांची धोरणे अत्यंत कडक आहेत. गृहमंत्री म्हणून त्यांनी 'इमिग्रेशन' नियमात मोठी कपात करण्याची योजना आखली आहे. "ब्रिटनमध्ये कायमस्वरूपी निवास मिळवणे हा अधिकार नसून ती एक विशेष सुविधा आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली कठोर भूमिका स्पष्ट केली होती. यामुळे दक्षिणपंथी लोकांमध्येही त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.

पंतप्रधान होण्याचा मार्ग कसा असेल?

शबाना महमूद यांना पंतप्रधान व्हायचे असेल, तर प्रथम कीर स्टारमर यांना पायउतार व्हावे लागेल. पक्षांतर्गत नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी किमान ८१ लेबर खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्याच्या वातावरणात शबाना महमूद या स्टारमर यांच्या सर्वात मोठ्या पर्याय म्हणून समोर येत आहेत. जर असे घडले, तर ब्रिटनला ऋषी सुनक यांच्यानंतर पुन्हा एकदा आशियाई वंशाचा पंतप्रधान मिळेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Shabana Mahmood: Potential first Muslim woman PM of Britain?

Web Summary : Amidst turmoil in the Labour Party, Shabana Mahmood emerges as a potential candidate for UK Prime Minister. As Home Secretary, her strict policies and rising influence could make history, challenging Keir Starmer's leadership. Her Asian heritage adds another layer to this political shift.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय