वर्क व्हिसाच्या नूतनीकरणासाठी अमेरिकन दूतावासात मुलाखतीची वेळ घ्यावी लागेल का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 18:47 IST2018-01-15T18:32:29+5:302018-01-15T18:47:28+5:30
इंटरव्ह्यू व्हेवर प्रोग्रामसाठी (आयडब्ल्यूपी) पात्र असाल तर तुम्हाला मुलाखतीला येण्याची आवश्यकता नाही. तुमची पत्नी/पती आणि मुलेसुद्धा त्यासाठी पात्र असतील.

वर्क व्हिसाच्या नूतनीकरणासाठी अमेरिकन दूतावासात मुलाखतीची वेळ घ्यावी लागेल का ?
प्रश्न- मी अमेरिकेचा वर्क व्हिसा घेतलेला आहे आणि मी भारतात माझ्या कुटुंबीयांना भेटायला आलो आहे. माझा व्हिसा नुकताच संपला आणि त्याचे मला नूतनीकरण करायचे आहे. अशा स्थितीत मला अमेरिकन महावाणिज्य दूतावासात मुलाखतीची वेळ घ्यावी लागेल का ?
उत्तर- नाही. जर तुम्ही आमच्या इंटरव्ह्यू व्हेवर प्रोग्रामसाठी (आयडब्ल्यूपी) पात्र असाल तर तुम्हाला मुलाखतीला येण्याची आवश्यकता नाही. तुमची पत्नी/पती आणि मुलेसुद्धा त्यासाठी पात्र असतील.
तुम्हाला आमच्या वेबसाईटवर व्हिसा अर्ज भरून त्यासाठी लागणारी फी भरावी लागेल. त्यानंतर वेबसाईटवर तुमच्या प्रश्नांची मालिका विचारली जाईल. जर तुम्ही आयडब्ल्यूपीसाठी पात्र झालात तर आमच्या कागदपत्रे जमा करण्याच्या 11 केंद्रांपैकी कोठेही तुम्हाला पासपोर्ट आणि वर्क व्हिसासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करावी लागतील. वाणिज्य दूतावासातील अधिकारी त्याची तपासणी करेल आणि त्यावर निर्णय घेईल. जर तुमच्या अर्जाबाबत एखादी शंका असेल तरच अधिकारी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावतील. आयडब्ल्यूपीसाठी पात्र असण्यासाठी तुमचा पूर्वीचा व्हिसा अधिकृत किंवा मागील 12 महिन्यांमध्ये मुदत संपलेला असावा लागतो.
जर तुम्ही आयडब्ल्यूपीसाठी पात्र नसाल तर तुम्हाला व्हिसा मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल. जर तुमचा व्हिसा अर्ज नुकताच नाकारला गेला असेल, तुम्ही एल-1 व्हिसाअंतर्गत काम करत असाल किंवा तुमच्या पूर्वीच्या व्हिसावर क्लीअरन्स रिसिव्हड किंवा डिपार्टमेंट अथोरायजेशन असे शेरे असतील तर आयडब्ल्यूपीसाठी पात्र होणार नाही. मात्र वर्क व्हिसासाठी तुम्ही याचिकाकर्ते बदलले असतील तर कदाचित तुम्ही आयडब्ल्यूपीसाठी पात्र होऊ शकाल.