इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. इस्रायल आणि अमेरिका दोघेही इराणवर हल्ले करत असतानाच, इराणनेही इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केले आहे. या युद्धात इराणला चीन आणि रशियाने पाठिंबा दिला आहे. हे युद्ध दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, 'चीनचा नास्त्रेदमस' म्हणून ओळखले जाणारे यू-ट्यूबर तथा प्रोफेसर जुएकिन जियांग यांची भविष्यवाणी सध्या जगभरात चर्चेत आहे.
मशहूर यूट्यूब चॅनल 'प्रोडक्टिव्ह हिस्ट्री'चे होस्ट आणि तत्वज्ञानाचे प्राध्यापक जियांग यांनी २०२४ मध्ये एका ऑनलाइन लेक्चरदरम्यान तीन महत्त्वाचे दावे केले होते. त्यापैकी पहिले दोन दावे तंतोतंत खरे ठरले. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत येतील आणि ते इराणसोबत युद्धाची सुरुवात करतील, असे जियांग यांनी म्हटले होते. हे खरे ठरले आहे. ट्रम्प यांचे पुनरागमन जाले आणि त्यांनी इराणसोबत युद्धही सुरू केले. या दोन्ही गोष्टी सत्यात सिद्ध झाल्या. मात्र, त्यांची तिसरी भविष्यवाणी सर्वाधिक धक्कादायक आहे; ती म्हणजे 'अमेरिका हे युद्ध इराणकडून हारणार'.
जियांग हे चीनमध्ये तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी येल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे आणि ते YouTube वर देखील सक्रिय असतात. या व्यासपीठाच्या माध्यमातून ते सध्याच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना, भू-राजकीय परिस्थिती आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करतात आणि त्यांचे मत मांडतात.
त्यांच्या मते, इराणमधील डोंगराळ भाग, लांब पुरवठा साखळी (Supply Line) आणि अमेरिकेतील अंतर्गत विरोध या गोष्टी अमेरिकेसाठी हे युद्ध अत्यंत कठीण बनवतील. जियांग यांच्या अचूक अंदाजामुळे सोशल मीडियावर त्यांची तुलना महान भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस यांच्याशी केली जात आहे. आता त्यांची तिसरी भविष्यवाणी खरी ठरते का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Rising US-Iran tensions prompt predictions from a Chinese professor, likened to Nostradamus. Two forecasts proved accurate, but his third, claiming America will lose a potential war with Iran, gains attention due to Iran's terrain and US internal opposition.
Web Summary : बढ़ते अमेरिका-ईरान तनाव के बीच चीनी प्रोफेसर ने नास्त्रेदमस जैसी भविष्यवाणी की है। उनकी दो भविष्यवाणियां सच हुईं, लेकिन तीसरी, जिसमें अमेरिका के ईरान से युद्ध हारने की बात कही गई है, ईरान के भूभाग और अमेरिका के आंतरिक विरोध के कारण ध्यान खींच रही है।