पत्नी नेहमी दु:खी अन् थकलेली असायची; पतीला आला संशय, बेडरूममध्ये कॅमेरा लावला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 08:25 AM2021-05-15T08:25:03+5:302021-05-15T08:30:52+5:30

मागील एकवर्षांपासून ती आपल्या पतीला आणि दुसऱ्या कोणालाच जास्त वेळ देऊ शकत नव्हती.

The wife was tired so the husband put the camera in the bedroom and found out the reason in america | पत्नी नेहमी दु:खी अन् थकलेली असायची; पतीला आला संशय, बेडरूममध्ये कॅमेरा लावला अन्...

पत्नी नेहमी दु:खी अन् थकलेली असायची; पतीला आला संशय, बेडरूममध्ये कॅमेरा लावला अन्...

Next

प्रत्येक पतीची नेहमीच अशी इच्छा असते की त्याची पत्नी नेहमी हसती खेळती आणि आनंदी दिसावी. पण बहुतेक वेळा असे काही होत नाही. अनेकवेळा याच कारणावरून दोघांमध्ये भांडण देखील झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मात्र दु:खी आणि थकलेली असण्यामागे कधीकधी दुसरे कारण देखील असते. ज्यामुळे पत्नी आनंदी राहण्याच्या ऐवजी दुःखी आणि थकलेली दिसते.

अमेरिकेत देखील अशीच एक घटना समोर आली आहे. लोस एंजिलिसमध्ये राहणाऱ्या मेलानिया दारनेलसोबत झालं. ती लग्नानंतर सुरुवातीच्या काळात नेहमी खुश राहायची आणि आपल्या पतीला वेळ द्यायची. पण मागील एकवर्षांपासून ती आपल्या पतीला आणि दुसऱ्या कोणालाच जास्त वेळ देऊ शकत नव्हती. खरंतर ती नेहमी थकलेली आणि अस्वस्थ दिसायची.

मेलानियाचे पती ट्रेवलिग जॉब करतात आणि नेहमी घराच्या बाहेर असतात. ट्रॅव्हलिंग जॉबवरून जेव्हापण मेलानियाचा पती घरी येत असे तेव्हा त्याची एकच तक्रार असायची की नेहमी ती थकलेली का दिसते आणि पुरेसा वेळ का देत नाही.त्यामुळे पती ने खरं जाणून घेण्यासाठी असं काही केलं की ज्याची कोणीही कल्पना देखील केली नसेल. परंतु मेलानिया आपल्या या प्रॉब्लेमच कारण जाणून होती.

मेलानियाच्या पतीला संशय होता की तो गेल्यानंतर पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवत तर नाही ना?, त्यामुळे पतीने आपल्याच बेडरूममध्ये कॅमेरा लावला आणि त्यामधून समोर आलं की त्याची पत्नी आपल्या मुलांना वेळ देत असल्यामुळे त्याला वेळ देऊ शकत नव्हती.

तीनही मुलं पूर्ण रात्र पत्नीला झोपूनही देत नव्हते आणि तिला सकाळी लवकर देखील उठायचं असायचं. यामुळेच पत्नी नेहमीच दु:खी आणि थकलेली दिसायची. आणि त्यामुळे ती नेहमी थकलेली दिसायची. पतीने पाहिलं की पत्नी आपलं मातृत्व धर्म किती चांगल्या प्रकारे निभावत आहे, तेव्हा त्याने एक व्हिडीओ शेयर केला आणि तिची माफी देखील मागितली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The wife was tired so the husband put the camera in the bedroom and found out the reason in america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app