पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:46 IST2025-11-04T15:44:57+5:302025-11-04T15:46:07+5:30
Viral Video News: कुठल्याही कुटुंबात मूल जन्माला आलं की अगदी आनंदात घरातील या नव्या सदस्याचं स्वागत केलं जातं. आई-वडिलांच्या आनंदाला तर पारावारच उरत नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओपासून लोकांना धक्काच बसला आहे.

पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
कुठल्याही कुटुंबात मूल जन्माला आलं की अगदी आनंदात घरातील या नव्या सदस्याचं स्वागत केलं जातं. आई-वडिलांच्या आनंदाला तर पारावारच उरत नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओपासून लोकांना धक्काच बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक पती-पत्नी रुग्णालयातील खोलीत दिसत आहेत. त्यातील पत्नी दोन नवजात बाळांना घेऊन रडत आहे. तर बाजूला उभा असलेला तिचा पती तिच्यासोबत जोराजोरात भांडत आहे. ही माझी मुलं नाहीत, असं तो ओरडून सांगताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ काही दिवसांमध्ये जगातील कानाकोपऱ्यात पोहोचला असून, त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.
अमेरिका असं लिहिलेलं असल्यानं हा व्हिडीओ अमेरिकेतील असावा असं वाटतं. या व्हिडीओत दिसत असलेले पती-पत्नी हे गोरे आणि सोनेरी केस असलेले आहेत. तर त्यांना झालेली मुले ही कृष्णवर्णीय आणि काळे केस असलेली आहेत. त्यावरून मुलांचा पिता चांगलाच भडकलेला दिसत आहे. तसेच तो मुलांना स्वीकारण्यास नकार देत आहे. त्यामुळे त्याची पत्नी हमसून हमसून रडत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. कदाचित मुलांची अदलाबदली झाल्यामुळे हे घडलं असावं असा अंदाज काही जणांनी व्हिडीओ पाहून बांधला. तर काही लोकांना हा व्हिडीओ खोटा असावा अशी शंका आली.
दरम्यान, या व्हिडीओची सखोर पडताळणी केल्यानंतर सत्य समोर आलं आहे. हा व्हिडीओ पूर्णपणे बनावट होता. हा व्हिडीओ एआयच्या माध्यमातून बनवण्यात आला असल्याची माहिती समोर आली. एवढंच नाही तर व्हिडीओत दाखवलेल्या बाळांची कुठलीच हालचाल होत नव्हती. एवढंच नाहीतर वडिलांच्या शरीराची हालचालही काहीशी वेगळीच होती. तसेच प्रत्येत प्रेममध्ये लायटिंग बदलताना दिसत होती. त्यामुळे हा व्हिडीओ एआयच्या मदतीने तयार केला गेल्याचं स्पष्ट झालं.