शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

International Mother Language Day : का साजरा केला जातो जागतिक मातृभाषा दिवस?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 5:12 PM

International Mother Language Day : जगभरात भाषा आणि संस्कृतिप्रती जागृकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 

भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहेत. त्यामुळे भाषेचं जतन करणं हे फार महत्वाचं ठरतं. त्याचसाठी यूनेस्कोने १७ नोव्हेंबर १९९९ ला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची घोषणा केली होती. तेव्हपासून जगभरात २१ फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो. जगभरात भाषा आणि संस्कृतिप्रती जागृकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 

कशी झाली सुरूवात?

२१ फेब्रुवारी १९५२ ला ढाका युनिवर्सिटीच्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी तत्कालिन पाकिस्तान सरकारच्या भाषा नीतिला जोरदार विरोध केला होता. पाकिस्तानच्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबारही केला. मात्र, विरोध अधिक वाढला आणि तत्कालिन पाकिस्तान सरकारने बांग्ला भाषेला अधिकृत दर्जा दिला. या आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या युवकांच्या स्मृती निमित्ताने यूनेस्कोने पहिल्यांदा 1999 मध्ये हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

यावर्षीची थीम

या जागतिक मातृभाषा दिनानिमित्ताने जगभरात यूनेस्को आणि यूएन भाषा आणि संस्कृतीसंबंधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. दरवर्षी एक खास थीम असते. यावर्षीची म्हणजे २०२० ची थीम "Languages without borders" अशी आहे. गेल्यावर्षी Indigenous languages as a factor in development, peace and reconciliation अशी थीम होती.

या नावांनीही ओळखला जातो हा दिवस

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाला टंग डे (Tongue Day), मदर लँग्वेज डे (Mother language Day), मदर टंग डे (Mother Tongue Day) , लँग्वेज मूव्हमेंट डे (Language Movement Day) आणि Shohid Dibosh या नावाने देखील ओळखले जाते.

भारतात देखील शेकडो भाषा बोलल्या जातात. वर्ष १९६१ च्या जनगणनेनुसार, भारतात १६५२ भाषा बोलल्या जातात. तसेच सध्याच्या रिपोर्टनुसार, भारतात १३६५ मातृभाषा आहेत. 

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सMother Language Dayमातृभाषा दिवस