शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
4
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
5
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
6
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
7
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
8
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
9
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
10
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
11
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
12
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
13
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
14
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
15
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
16
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
17
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
18
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
19
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी टिकटॉकर सुंदरी सना युसूफला तिच्याच घरात घुसून दिवसाढवळ्या का मारलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 11:35 IST

इतक्या कमी वयात तिचे इतके फॉलोअर्स आहेत म्हटल्यावर पाकिस्तानात, त्यातही तरुणाईत ती किती प्रसिद्ध असेल याची कल्पना यावी.

पाकिस्तानात गुन्हेगारी कधीच नवी नव्हती, नाही. त्यामुळे लोकांनाही जणू आता त्याची सवयच झाली आहे. रस्त्यावर, खुलेआम गुन्हेगारीच्या घटना घडत असतात. गोळीबार होत असतो. आताही अशीच एक घटना घडली आहे. या घटनेनं मात्र तिथलं समाजमन हादरलं आहे. पाकिस्तानातील सना युसूफ ही टिकटॉक स्टार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. सना केवळ सतरा वर्षांची, पण तरीही टिकटॉकवर तिचे सुमारे आठ लाख आणि इन्स्टाग्रामवर पाच लाख फॉलोअर्स आहेत. इतक्या कमी वयात तिचे इतके फॉलोअर्स आहेत म्हटल्यावर पाकिस्तानात, त्यातही तरुणाईत ती किती प्रसिद्ध असेल याची कल्पना यावी.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे याच सनाची, तिच्याच घरात घुसून दिवसाढवळ्या मारेकऱ्यानं गोळ्या मारून हत्या केली! मारेकऱ्यांची आता निरपराधांना घरात घुसून मारण्याइतकी हिंमत वाढली आहे, कायदा-सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत. यावरून पाकिस्तानात सध्या खळबळ माजली आहे. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला असला तरी यावरून समाजमन अस्वस्थ झालं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार संध्याकाळी पाचच्या सुमारास एक तरुण सनाच्या घरी आला आणि त्यानं सनावर गोळ्या चालवल्या. छातीत गोळी लागल्यानं ती गंभीर जखमी झाली; पण रुग्णालयात नेत असतानाच तिचं निधन झालं.

कोणाला वाटेल, ही साधी खुनाची घटना आहे, पण तसं नाही. अशा प्रकारच्या घटनांत अलीकडे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकामागोमाग अशा घटना घडत असल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत. विशेषत: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, टिकटॉक स्टार, तरुणाईत प्रसिद्ध असलेले लोक, विशेषत: तरुणींना ठार मारण्याच्या घटना वाढत आहेत. त्यातही विशेष म्हणजे, काही घटनांमध्ये या तरुणींच्या अत्यंत जवळच्या लोकांनीच त्यांना ठार मारलं आहे. 

पंजाबच्या खुशाब प्रांतात एका टिकटॉकर आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या तरुणीला तिच्या चुलतभावानं ठार मारलं. तीन महिन्यांपूर्वी एका टिकटॉकर तरुणीचा पेशावरमध्ये अशाच प्रकारे जीव घेण्यात आला. त्याआधी जानेवारी महिन्यात क्वेट्टा येथे खुद्द वडिलांनीच आपल्या सोशल मीडिया स्टार, टिकटॉकर मुलीला ठार मारलं होतं. या घटनेमुळेही पाकिस्तानात खूप मोठी खळबळ माजली होती; कारण हे कुटुंब याआधी २५ वर्षे अमेरिकेत राहत होतं. ‘खुल्या विचारांचे’ म्हणून ते प्रसिद्ध होते. असे असतानाही खुद्द पित्यानेच आपल्या मुलीची हत्या करावी, हे अनेकांसाठी न उलगडणारं कोडं होतं.

पोलिस तपासात नंतर निष्पन्न झालं की हे कुटुंब ‘अमेरिका रिटर्न’ असलं तरी मुळात त्यांचे विचार पारंपरिकच होतं. मुलीचे कपडे, तिची जीवनशैली, तिचं राहणीमान त्यांना बिलकुल पसंत नव्हतं. त्यामुळे खुद्द बापानंच मुलीला ठार केलं. गेल्या वर्षी सियालकोटमध्ये सख्ख्या भावानंच आपल्या टिकटॉकर बहिणीची हत्या केली! आपल्या बहिणीनं सोशल मीडियावर, चारचौघांत असं वावरणं त्याला पसंत नव्हतं. आपल्या घराण्याची त्यामुळे इज्जत जाते, असं त्याला वाटत होतं. पाकिस्तानात जवळच्या नातेवाइकांकडूनच तरुणींच्या हत्या होताहेत त्याचं ‘ऑनर किलिंग’ हेच कारण आहे! सनाच्या हत्येचा तपासही त्याच दृष्टीनं सुरू आहे.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकPakistanपाकिस्तानWorld Trendingजगातील घडामोडी