शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:13 IST

हमास आणि इराणविरुद्धच्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेलं एक कठोर व्यक्तिमत्त्व. संपूर्ण जगभरात आज त्यांच्याविषयी चर्चा आहे आणि जग त्यांच्या नावानं टराटरा घाबरतं.

डोनाल्ड ट्रम्प, पुतीन, शी जिनपिंग, किम जोंग उन..  ही अलीकडच्या काळातील काही प्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध जागतिक नेत्यांची नावं. याच यादीत सध्या आणखी एक नाव प्रामुख्यानं झळकतं आहे, ते म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू. हमास आणि इराणविरुद्धच्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेलं एक कठोर व्यक्तिमत्त्व. संपूर्ण जगभरात आज त्यांच्याविषयी चर्चा आहे आणि जग त्यांच्या नावानं टराटरा घाबरतं.

एकीकडे हमासबरोबर संघर्ष सुरू असताना दुसरीकडे त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं. जे ठरवू ते तडीस नेऊच, अशी त्यांची ख्याती आहे. इराणविरुद्धच्या संघर्षात बऱ्याच मोठ्या देशांनाही त्यांनी आपल्या बाजूनं वळवलं. अमेरिकेनं तर थेट इस्रायलची बाजू घेत इराणला नुसता दमच दिला नाही, तर त्यांच्यावर शस्त्रास्त्रंही डागली. 

मुळात कसे आहेत बेंजामिन नेतन्याहू? त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा झाला? त्यांच्या वैयक्तिक आणि खासगी आयुष्यात चढउतार का आणि कशामुळे आले? ते आज जे काही आहेत ते तसे कशामुळे झाले?.. याविषयी लोकांना फारच उत्सुकता आहे. त्यांच्या आयुष्याचा प्रवास जितका रोमांचक, तितकाच अनेक चढउतारांनी भरलेला आहे. 

नेतन्याहू हे आपल्याला इस्रायलचे पंतप्रधान आणि कठोर राजकारणी म्हणून माहीत असले तरी तेवढीच त्यांची ओळख नाही. ते एक सैनिक आहेत, लेखक आहेत, अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत, विविध भाषांचे ते जाणकार आहेत. हिब्रू, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. फुटबॉलपटू आहेत, बुद्धिबळात पारंगत आहेत. त्यामुळे तेच डावपेच ते रणांगणातही वापरत असतात. ते उत्तम वाक्पटू आहेत. अर्थात आपल्या हट्टी स्वभावामुळे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख आहेच. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे २१ ऑक्टोबर १९४९ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या तरुणपणी इस्रायली सैन्यामध्ये कॅप्टनची भूमिका त्यांनी बजावली आहे. १९७३ मध्ये अरब-इस्रायल युद्धात त्यांची ही भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्यांचं टोपणनाव आहे ‘बिबी’. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा इस्रायलचे पंतप्रधान बनले. त्यानंतर तब्बल १७ वर्षे त्यांनी इस्रायलचं नेतृत्व केलं. त्यामुळे ‘किंग बिबी’ या नावानं इस्रायली जनतेत ते परिचित आहेत. केवळ देशातच नाही, तर संपूर्ण जगात आज या ‘किंग बिबी’चा दबदबा आहे. 

त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढउतार आले. नेतन्याहू यांनी तीन लग्नं केली. १९७२मध्ये पहिल्यांदा त्यांनी मिरियम वाइजमन यांच्याशी विवाह केला. १९७८मध्ये त्यांना मुलगी झाली, पण त्याच वर्षी त्यांचा घटस्फोटही झाला. त्यानंतर १९८१ मध्ये ब्रिटिश महिला फ्लोर केट्स यांच्याशी त्यांनी विवाह केला. पण हा विवाहही फार काळ टिकला नाही. 

१९८८मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर १९९१ मध्ये फ्लाइट अटेंडंट सारा आट्जी यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला. या विवाहातून त्यांना दोन मुली झाल्या. तिन्ही विवाह मिळून त्यांना एकूण तीन अपत्यं आहेत. 

वयाच्या ४७व्या वर्षी ते इस्रायलचे पहिले सर्वांत तरुण पंतप्रधान झाले. जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत त्यांची गणना होते. फोर्ब्जच्या यादीत त्यांचे नाव आहे आणि त्यांची संपत्ती ६९३ कोटी रुपये इतकी आहे!

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायलIranइराणwarयुद्धIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध