डोनाल्ड ट्रम्प यांना का हवाय ग्रीनलँडवर कब्जा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 10:43 IST2025-04-01T10:42:45+5:302025-04-01T10:43:05+5:30
Greenland News: डेन्मार्कच्या अधिपत्याखाली असलेला आणि काही प्रमाणात स्वायत्तता मिळालेला ग्रीनलँडचा प्रदेश अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्याने ताब्यात घ्यावा, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार सांगत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना का हवाय ग्रीनलँडवर कब्जा?
डेन्मार्कच्या अधिपत्याखाली असलेला आणि काही प्रमाणात स्वायत्तता मिळालेला ग्रीनलँडचा प्रदेश अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्याने ताब्यात घ्यावा, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार सांगत आहेत. त्यासाठी अमेरिका योग्य ती कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. ग्रीनलँड खनिजांनी विपुल भूभाग आहे. त्याच्या बळावर अमेरिकेची अर्थव्यवस्था भावी काळात अधिक बळकट होऊ शकते.
या कारणांमुळे ट्रम्प यांना हवे ग्रीनलँड
१) संरक्षणदृष्ट्या अतिशय मोक्याचे आहे.
२) ताब्यात असल्यास युरोपहून उत्तर अमेरिकेला कमी वेळेत पोहोचता येईल.
३) अमेरिकेची क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा बसविण्यासाठी महत्त्वाचे.
४) सध्या अमेरिकेचा ग्रीनलँडमध्ये पिटफिक हवाई तळ आहे. १९५१ साली डेन्मार्क, अमेरिकेमध्ये झालेल्या करारानुसार हा हवाई तळ उभारण्यात आला.
ग्रीनलँडची अर्थव्यवस्था
मासेमारी व माशांची होणारी निर्यात यावर ग्रीनलँडचे ९५ टक्के अर्थव्यवहार अवलंबून. डेन्मार्ककडून काही सबसिडीही दिली जाते.
डेन्मार्क ग्रीनलँडवर दरवर्षी १ अब्ज डॉलर खर्च करते. म्हणजेच तेथील रहिवाशांवर दरवर्षी प्रत्येकी १७५०० डॉलर खर्च होतात.
ग्रीनलँडची विद्यमान स्थिती
१९५३ : ग्रीनलँड हे डेन्मार्कच्या ताब्यातील बेट आहे. तशी तरतूद १९५३ साली त्या देशाच्या राज्यघटनेत करण्यात आली.
२००९ : ग्रीनलँडला स्वत:चे सरकार स्थापन करण्याची मुभा देण्यात आली, तसेच डेन्मार्कपासून स्वतंत्र होण्याचा हक्कही प्रदान करण्यात आला.
स्वातंत्र्याची डेन्मार्कने घोषणा करण्याची मागणी
ग्रीनलँँड स्वतंत्र झाला असल्याची अधिकृत घोषणा डेन्मार्कने करावी अशी या बेटावर गेल्या ११ मार्च रोजी झालेल्या निवडणुकांत विजयी ठरलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाची इच्छा आहे. अन्य पक्षांनीही आम्हाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते.
हे भय आहे ग्रीनलँडच्या मनात : ग्रीनलँडमधील लोकांनाही स्वातंत्र्य हवे आहे. मात्र, तेथील श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरिबांच्या मनात एक धाकधूक आहे.
नवीन वसाहतवादी आमच्यावर राज्य करून आणखी अन्याय करतील अशी भीती तेथील नागरिकांना वाटते.