शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लेख: शाळकरी मुलं का घेताहेत मित्रांचाच जीव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 09:53 IST

मुलांच्या हाती इतकी हिंसक शस्त्रास्त्रं कशी येतात? आपल्याच मित्रांवर, शाळकरी विद्यार्थ्यांवर गोळ्या चालवण्याची, आपल्या शिक्षकांना ठार मारण्याची हिंमत त्यांच्यात कुठून येते आणि ही दुर्बुद्धी त्यांना कशी सुचते?

काही दिवसांपूर्वीचीच घटना. ऑस्ट्रियाचं ग्राज शहर. तिथली एक प्रसिद्ध शाळा. सकाळची वेळ. शाळेत सगळी लगबग सुरू. त्याच वेळी त्याच शाळेचा एक माजी विद्यार्थी येतो. त्याच्या हातात बंदूक असते. तिथे जमलेल्या मुलांवर तो अंदाधुंद गोळीबार करतो. त्यानंतर तो स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या करतो. या घटनेत किमान अकरा जण ठार झाले. त्यांत शाळेच्या एका शिक्षिकेचाही समावेश आहे. 

या घटनेमुळे शाळकरी विद्यार्थ्यांमधील हिंसाचाराची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. का होतात अशा घटना? मुलांच्या हाती इतकी हिंसक शस्त्रास्त्रं कशी येतात? आपल्याच मित्रांवर, शाळकरी विद्यार्थ्यांवर गोळ्या चालवण्याची, आपल्या शिक्षकांना ठार मारण्याची हिंमत त्यांच्यात कुठून येते आणि ही दुर्बुद्धी त्यांना कशी सुचते?

अलीकडच्या काळात ऑस्ट्रियामध्ये या घटना वारंवार घडायला लागल्या असल्या तरी याबाबतीत जगातील सर्वांत समृद्ध आणि विकसित देश अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत दर काही दिवसांत अशा घटना घडल्याच्या पाहायला मिळतात. शाळकरी विद्यार्थ्यांच्या हत्या होण्यात अमेरिकेचं प्रमाण सर्वांत अधिक आहे. मुलांना सहजपणे हत्यारे उपलब्ध होणं, हत्यारं बाळगण्याबाबत पुरेसे कठोर कायदे नसणं आणि शस्त्रास्त्रांची लॉबी लोकांच्या जीवनमरणापेक्षा अधिक महत्त्वाची तसंच बळकट असणं ही कारणं तर त्यामागे आहेतच; पण शाळकरी मुलं इतकी हिंसक का होतात, यामागची कारणं आता अभ्यासकांना आणि संशोधकांना अधिक चिंतेत टाकताहेत.

या संदर्भात नुकताच झालेला एक अभ्यास सांगतो, त्या त्या देशांतलं गनकल्चर. घरातच आई-बापाकडून मुलांना मिळालेली हिंसेची संस्कृती... ही कारणंही त्यामागे आहेत. कुटुंबातील विसंवाद, त्यांच्यातील भांडणं, पालकांचं मुलांवर लक्ष नसणं, मुलांना त्यांची ‘स्पेस’ देण्याच्या नावाखाली पालकांनी स्वत:च्याच मस्तीत मश्गुल राहणं, मुलांमधील मानसिक विकार, नैराश्य... यांमुळेही अशा घटना घडताहेत. त्याकडे कोणाचंच गांभीर्यानं लक्ष नाही. 

अभ्यासकांनी याहीपेक्षा आणखी काही महत्त्वाच्या कारणांकडे लक्ष वेधलं आहे. ही कारणं तर आपल्या खिजगणतीतही नाहीत. पालक, शिक्षक, शाळाही त्यांच्याकडे फारसं गांभीर्यानं पाहत नाहीत. त्यांच्या दृष्टीनं जणू काही या गोष्टीशी आपला काही संबंधच नाही!

मुलं हिंसक का बनतात आणि इतक्या टोकाचा विचार का करतात आणि प्रत्यक्ष तशी कृतीही करतात यामागचं सर्वांत महत्त्वाचं कारण आहे, सोबतच्याच मुलांनी, मित्र-मैत्रिणींनी सारखं चिडवणं, मानसिक, शारीरिक छळ करणं, धमक्या देणं... यांमुळे वैतागून एका टोकाच्या क्षणी मुलं अशी कृत्यं करतात आणि त्याचं प्रमाण ७५ टक्के आहे. सूडाच्या भावनेनं घडलेल्या घटना ६१ टक्के, तर इतर कारणांमुळे घडलेल्या घटनांचं प्रमाण ५४ टक्के आहे. आपल्याला आणि आपल्या प्रश्नांना आता कोणीच वाली नाही, त्यामुळे हा प्रश्न आता आपणच सोडवला पाहिजे, या हेतूनं बंदुका उचलणाऱ्या मुलांचं प्रमाण ३४ टक्के आहे. नैराश्यामुळे घडलेल्या घटना २७ टक्के, तर कोणीच आपल्याकडे लक्ष देत नाही ना, मग आपणच इतरांचं लक्ष वेधून घेऊ, म्हणून घडलेल्या घटनांचं प्रमाणही २४ टक्के आहे !

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयSchoolशाळा