शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

तीन दिवसांत 'तिचे' ३१ हजार कोटी रुपये बुडाले! कसे काय? कोण आहे 'ही' महिला, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 08:04 IST

एका रात्रीत वर्तमान आणि भविष्य कसं बदलतं याचं हे एक ठळक उदाहरण!

शेअर बाजारात पैसा गुंतवला की तो दामदुपटीनं वाढतो, त्यामुळे त्यातच आपला जास्तीत जास्त पैसा गुंतवावा’ आणि ‘शेअर बाजारात पैसे गुंतवले तर लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागणार नाही’ अशी दोन्ही प्रकारची मतं शेअर बाजाराबाबत ऐकायला मिळतात. अर्थातच दोन्ही गोष्टी पूर्णपणे सत्य नाहीत. पण शेअर बाजारात हुशारीनं पैसा गुंतवला, फार लोभ दाखवला नाही, तर इतर गुंतवणुकीपेक्षा शेअर बाजार तुम्हाला नक्कीच जास्त पैसा देऊन जातो, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यातलं तारतम्य तुम्ही पाळायला हवं, हा त्याचा मतितार्थ.

पण शेअर बाजार तुम्हाला एका रात्रीत कसा गर्भश्रीमंत करतो आणि एका रात्रीत तुम्हाला दणकन जमिनीवर कसा आदळतो, याचं एक उदाहारण नुकतंच इंडोनेशियात घडलं आहे. सर्वाधिक मुस्लीम बांधव असलेला इंडोनेशिया हा जगातला प्रमुख देश. याच देशातील मरीना बुडीमान (Marina Budiman) ही ‘सर्वाधिक श्रीमंत’ महिला. मरीना यांची ‘डीसीआय इंडोनेशिया’ ही एक प्रख्यात कंपनी. या कंपनीचं इंडोनेशियात बरंच नाव आहे. मरीना यांना जो नावलौकिक मिळाला, तोही या कंपनीमुळेच. इंडोनेशियाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात मरीना यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं.

त्यांच्या बाबतीत एक मोठा ‘चमत्कार’ जगानं अनुभवला. गेल्या आठवड्यात तीन दिवसांत त्यांना आपली तब्बल ३.६ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३१ हजार कोटी रुपयांची संपत्ती गमवावी लागली!  तीनच दिवसांत त्यांची संपत्ती चक्क निम्म्यानं कमी झाली! कारण काय? - तर शेअर बाजारातील चढउतार!

पण त्याहून आश्चर्याची गाेष्ट म्हणजे तीन दिवसांत ही जी अब्जावधी  रुपयांची संपत्ती त्यांना गमवावी लागली, त्याआधी काही दिवस त्या सातत्यानं दिवसाला तीन हजार कोटी रुपये कमवत होत्या! अर्थात ही किमयाही शेअर बाजाराचीच! ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार शेअर बाजारात अचानक तेजी आली आणि मरीना यांची संपत्ती काहीच दिवसांत इतकी वाढली की ती ७.५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. पण, त्याचंच दुसरं टोक म्हणजे हीच संपत्ती ज्या झपाट्यानं आणि डोळे दीपवणाऱ्या वेगानं वाढली, ती पत्त्यांच्या बंगल्यांपेक्षाही वेगानं जमीनदोस्त झाली! अर्थात तज्ज्ञांचं म्हणणं आहे, शेअर बाजारात अशा गोष्टी होतच असतात. मरीना यांच्या कपंनीचे शेअर घसरले म्हणून लगेच त्या कंपनीचं अस्तित्व संपलं किंवा या कंपनीचं भविष्य खराब झालं असं नाही. स्वत: मरीना यांनाही या गोष्टीचा फारसा गमपस्तावा नाही. त्या म्हणतात, शेअर बाजारातील तेजीमुळे माझी संपत्ती वाढल्यानं मला हर्षवायू झाला नव्हता आणि आता शेअर बाजारातील घसरणीमुळे माझी अर्धी संपत्ती कमी झाल्यानं मी दु:खात बुडाले असं नाही. या गोष्टींची तयारी आणि मानसिकता तुम्ही ठेवलीच पाहिजे.  

शेअर बाजारातील चढउतार ही इंडोनेशियासाठी नेहमीची बाब आहे. त्यामुळेच ‘डीसीआय इंडोनेशिया’ कंपनीच्या शेअर्समधील तीव्र फेरबदलही याला अपवाद नाहीत. इंडोनेशियातील अनेक कंपन्या तर अशा आहेत, ज्यांच्या शेअर्समध्ये तब्बल १००० टक्क्यांहून अधिक वाढ आणि घट पाहायला मिळालेली आहे. अर्थातच एवढे चढउतार नकोत, पण त्यामुळे एका रात्रीत वर्तमान आणि भविष्य कसं बदलतं याचं हे एक ठळक उदाहरण!

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीshare marketशेअर बाजारIndonesiaइंडोनेशिया