शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 09:11 IST

Xi Mingze: इतरही अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांची मुलं-मुली जगाला अपरिचित नाहीत. पण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मुलीबाबत कुणाला काही माहीत आहे?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मुली मालिया आणि साशा.. यांना जग बऱ्यापैकी ओळखतं. कुठल्या ना कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमांत त्या कायम दिसत असतात. इतरही अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांची मुलं-मुली जगाला अपरिचित नाहीत. पण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मुलीबाबत कुणाला काही माहीत आहे? किंबहुना त्यांना एखादी मुलगी आहे, हे तरी जगात फारसं कोणाला ठाऊक आहे? याबाबतीत शी जिनपिंग आणि रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांच्यात बऱ्यापैकी साम्य आहे. 

या दोघांनीही आपल्या मुलांबाबत फारशी कुठे वाच्यता केलेली नाही आणि त्यांना जगाच्या नजरेसमोरही आणलं नाही. उलट होता होईतो जगापासून आपली अपत्ये लांबच कशी राहतील याचाच त्यांनी आजवर प्रयत्न केला आहे. पण शी जिनपिंग यांना एक मुलगी आहे आणि ती सध्या अमेरिकेत आहे, हे ‘गुपित’ सध्या सगळीकडेच फुटलं आहे. 

शी जिनपिंग यांच्या मुलीचं नाव शी मिंगजे. ती अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाची पदवीधर आहे. सध्या तिच्यावरूनच राजकारण तापलं आहे. शी मिंगजे सध्या अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स येथे चिनी मिलिटरीच्या कडेकोट बंदोबस्तात ‘गुप्तपणे’ राहत आहे, अशी चर्चा आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी त्यातही चिनी विद्यार्थ्यांच्या व्हिसाबाबत कडक धोरण स्वीकारल्यानंतर आणि हार्वर्ड विद्यापीठावर डोळे वटारल्यानंतर शी मिंगजेचीही आता अमेरिकेतून हकालपट्टी होणार का, याविषयीच्या चर्चा संपूर्ण जगभरात रंगल्या आहेत. शी मिंगजेबाबत अनेक गोष्टींना आता उधाण आलं आहे. शी जिनपिंग यांची ती एकुलती एक मुलगी आहे. 

तिच्याविषयी सध्या फारच थोडी माहिती लोकांना आहे. तिचा जन्म २७ जून १९९२ला झाला. मिंगजे पहिल्यांदा चर्चेत आली, जेव्हा २००८मध्ये सिचुआन येथे भूकंप आला होता, त्यावेळी ती शाळेतून सुटी घेऊन एक आठवड्यासाठी तेथील बचाव कार्यात सहभागी झाली होती. भूकंपात गंभीर जखमी झालेल्या लोकांची तिनं मनोभावे सेवाही केली होती. त्यावेळी ती १६ वर्षांची होती. 

२०१० मध्ये अमेरिकेत हॉर्वर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी ती गेली. आपली ओळख गुप्त ठेवण्यासाठी तिनं तिथे बनावट नावाचा वापर केला. २०१२मध्ये वॉशिंग्टन पोस्टनं पहिल्यांदा या गोष्टीचा भंडाफोड केला. तिथे ज्यांचा तिच्याशी परिचय झाला, त्यांच्या मते मिंगजे ही अतिशय शांत, अभ्यासू आणि राजकारणात रुची असलेली तरुणी आहे. 

तिची आई पेंग लियुआन गायिका आहे. तिचे आजोबा शी झोंगशून हे कम्युनिस्ट क्रांतिकारक होते. ते आपल्या नातीला प्रेमानं ‘शियाओ मुझी’ म्हणायचे. याचा अर्थ एक साधीभोळी, पण सामाजाला उपयोगी पडणारी मुलगी. मिंगजेचं चिनी भाषेबरोबरच इंग्रजी आणि फ्रेंचवरही प्रभुत्व आहे. मिंगजे सध्या संपूर्ण जगात चर्चेत असली तरी तिच्या ‘हेरगिरी’बाबत अनेक गोष्टी अजूनही रहस्यमयच आहेत. 

अमेरिकेलाही शिंगावर घेऊ पाहणारे चीनचे सर्वोच्च नेते शी जिनपिंग आपल्या मुलीची अमेरिकेतून हकालपट्टी होण्यापासून वाचवू शकतील का, हा प्रश्न सध्या फारच चर्चेत आहे. पण त्याहीपेक्षा मिंगजे अजूनही अमेरिकेतच आहे की चीनमध्ये परतली, याबाबतही ठोसपणे अजून कोणालाच काहीच माहीत नाही.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीchinaचीनAmericaअमेरिकाXi Jinpingशी जिनपिंग