शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Anita Anand : कोण आहेत अनिता आनंद? ज्या होऊ शकतात कॅनडाच्या पुढील पंतप्रधान, भारताशी आहे खास नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:20 IST

Anita Anand : कॅनडाच्या पुढील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनिता आनंद, पियरे पॉलीव्रे, क्रिस्टिया फ्रीलँड आणि मार्क कार्नी यांसारखी प्रमुख नावे पुढे येत आहेत.

Justin Trudeau Resignations: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा सोमवारी (६ जानेवारी)राजीनामा दिला. सरकारवर आणि वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीकेमुळे हा निर्णय घेतल्याचे जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.

कॅनडाच्या पुढील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनिता आनंद, पियरे पॉलीव्रे, क्रिस्टिया फ्रीलँड आणि मार्क कार्नी यांसारखी प्रमुख नावे पुढे येत आहेत. यापैकी भारतीय वंशाच्या नेत्या अनिता आनंद त्यांच्या प्रभावी कारभारामुळे आणि सार्वजनिक सेवेच्या चांगल्या रेकॉर्डमुळे प्रबळ दावेदार मानल्या जातात.

अनिता आनंद या कॅनडाच्या पंतप्रधान झाल्या, तर जस्टिन ट्रूडो यांच्या काळात कॅनडा आणि भारत यांच्यात बिघडलेले संबंध पुन्हा चांगले होतील, अशी अपेक्षा केली जाऊ शकते. दरम्यान, कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. या कारणास्तव भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होणे भारतासाठी चांगले संकेत देऊ शकते. 

याआधी जस्टिन ट्रूडो यांच्या कारकिर्दीत भारतावर हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा खोटा आरोप करण्यात आला, त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. कॅनडाच्या सरकारने या संदर्भात कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही. याचा परिणाम असा झाला की, पक्षातील इतर नेत्यांशी जस्टिन ट्रुडोचे संबंध बिघडले. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

अनिता आनंद परिवहन आणि गृहमंत्रीजस्टिन ट्रुडो यांची जागा घेणाऱ्या पहिल्या पाच उमेदवारांमध्ये भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांचे नाव बीबीसीद्वारे दाखवण्यात आले आहे. ५७ वर्षीय अनिता आनंद सध्या देशाच्या परिवहन आणि गृहमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या शैक्षणिक आणि राजकीय पार्श्वभूमीमुळे त्या एक महत्त्वाची राजकीय व्यक्ती म्हणून उदयास आल्या आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या टोरंटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापक होत्या.

अनिता आनंद यांची कौटुंबिक पार्श्वभूमीअनिता आनंद यांचा जन्म नोव्हा स्कॉशियाच्या केंटविले येथे झाला. त्यांचे आई-वडील सरोज डी. राम आणि एस.व्ही. (अँडी) आनंद, हे दोघेही भारतीय चिकित्सक होते. त्यांच्या दोन बहिणी गीता आणि सोनिया आनंद याही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. अनिता आनंद यांनी २०१९ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि तेव्हापासून त्या लिबरल पक्षाच्या सर्वात महत्त्वाकांक्षी सदस्यांपैकी एक बनल्या आहेत.

टॅग्स :CanadaकॅनडाJustin Trudeauजस्टीन ट्रुडोIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय