शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

निज्जरवर कॅनडाला इनपुट देणारा कोण, अमेरिका भारतासोबत खेळतोय का डबल गेम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 12:18 IST

दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंट्सचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता.

दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंट्सचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला. यानंतर कॅनडावर यासंबंधीचे पुरावे देण्याचा दबाव सातत्याने वाढत आहे. अशातच काही मीडिया रिपोर्ट्स समोर आले आहेत. यामध्ये कॅनडाकडे भारतीय अधिकाऱ्यांच्या संवादाशी संबंधित पुरावे असल्याचे सांगण्यात आलेय. फाइव्ह आईज (Five Eyes) संस्थेच्या एका सदस्यानं यासंबंधीची माहिती दिल्याचंही अहवालात म्हटलंय. दरम्यान, अमेरिकेनेच ही माहिती दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फाइव्ह आईज ही अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची गुप्तचर संस्था आहे.त्यांच्याकडे सिग्नल इंटेलिजन्स असल्याची बातमी कॅनडाच्या माध्यमांमध्ये आली होती. यामध्ये कॅनडामध्ये उपस्थित असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांच्या संवादाशी संबंधित पुरावे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यामुळे या अधिकाऱ्यांवर हेरगिरी करण्यात आल्याचंही मानलं जात आहे. कदाचित त्यांचा मोबाईल, ईमेल किंवा लॅपटॉप हॅक झाला असावा अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. भारतानं कॅनडाचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून ते कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे म्हटलेय. यासोबतच कॅनडानं अद्याप कोणतेही पुरावे दिले नसल्याचे सांगण्यात आलेय.ट्रूडो यांनीही याला केवळ आरोप म्हटले आहे. शुक्रवारी यूएनजीएमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो उपस्थित होते. आपण या गोष्टी अतिशय गंभीरपणे सांगितल्या असल्याचे ते यावेळी म्हणाले. फाइव्ह आईजच्या अहवालातील गुप्तचर माहिती प्रसारमाध्यमांसमोर आली आहे. कॅनडाच्या सरकारकडून याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. दरम्यान, याबाबात प्रश्न विचारल्यावर कॅनडाच्या उपपंतप्रधान क्रिस्टीया फ्रिलँड यांनी यावर वक्तव्य करण्यास नकार दिला. त्यांनी ते थेड नाकारलं नाही किंवा थेट त्याचा स्वीकारही केला नाही.चर्चा विश्वासावरया चर्चा विश्वासावर केल्या जात असल्याचं पुरव्यांबाबत म्हणताना उपपंतप्रधानांनी सांगितलं. तर दुसरीकडे आपण काही आठवड्यांपूर्वीच दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येच्या आरोपांशी निगडीत पुरावे भारताला सोपवले असल्याचे ट्रुडो म्हणाले. आम्ही भारतासोबत रचनात्मक पद्धतीनं काम करण्यास तयार आहोत. या गंभीर प्रकरणाच्या मूळापर्यंत पोहोचण्यासाठी ते आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा आहे, असंही त्यांनी नमूद केलं

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारत