WHO'चे प्रमुख थोडक्यात बचावले, विमानात जात असताना झाला बॉम्बस्फोट, दोन क्रू मेंबर गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:17 IST2024-12-27T13:15:18+5:302024-12-27T13:17:37+5:30
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडनॉम गुरुवारी यमन येथील विमानतळावर इस्त्रायलच्या एअरस्ट्राइकमध्ये थोडक्यात बचावले.

WHO'चे प्रमुख थोडक्यात बचावले, विमानात जात असताना झाला बॉम्बस्फोट, दोन क्रू मेंबर गंभीर जखमी
यमन मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडनॉम गुरुवारी यमन येथील विमानतळावर इस्त्रायलच्या एअरस्ट्राइकमध्ये थोडक्यात बचावले. या हल्ल्यात दोन जणांचा मृ्त्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. टेड्रोस त्यांच्या संयुक्त राष्ट्र (US) आणि डब्ल्यूएचओ सहकाऱ्यांसोबत फ्लाइटमध्ये बसणार होते तेवढ्यात हल्ला झाला. यावेळी विमानातील दोन क्रू मेंबर्स जखमी झाले.
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये, WHO प्रमुख गेब्रेयसस म्हणाले, “यूएन कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्याचे आणि येमेनमधील आरोग्य आणि मानवतावादी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याचे आमचे ध्येय आज संपत आहे. कैद्यांची तात्काळ सुटका व्हावी, यासाठी आम्ही सतत आवाहन करत राहू. आम्ही सनाहून आमच्या फ्लाइटला निघायच्या सुमारे दोन तास आधी, विमानतळावर हवाई गोळीबार झाला. आमच्या विमानातील क्रू मेंबर्सपैकी एक जखमी झाले आहेत.
त्यांनी पुढे लिहिले की, विमानतळावर किमान दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर, डिपार्चर लाउंज – आम्ही होतो तिथून काही मीटर अंतरावर – आणि धावपट्टी खराब झाली होती. आम्ही निघण्यापूर्वी विमानतळाचे नुकसान दुरुस्त होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. माझे UN आणि WHO सहकारी आणि मी सुरक्षित आहोत.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करण्याचे आवाहन केले आणि नागरिक आणि मानवतावादी कामगारांना कधीही लक्ष्य केले जाऊ नये यावर भर दिला.
ट्विटरवरील एका पोस्टमध्ये, गुटेरेस यांनी येमेन आणि इस्रायलमधील तणावाबद्दल खेद व्यक्त केला आणि येमेनमधील साना आंतरराष्ट्रीय विमानतळ, लाल समुद्रातील बंदरे आणि पॉवर स्टेशनवरील हवाई हल्ले धोकादायक असल्याचे वर्णन केले. संयुक्त राष्ट्र प्रमुखांच्या म्हणण्यानुसार हवाई हल्ल्यांमुळे असंख्य जीवितहानी झाल्याची माहिती आहे, कमीतकमी तीन लोक ठार आणि डझनभर जखमी झाले आहेत. त्यांनी सर्व पक्षांना लष्करी कारवाई थांबवून संयम बाळगण्याचे आवाहन केले.
Our mission to negotiate the release of @UN staff detainees and to assess the health and humanitarian situation in #Yemen concluded today. We continue to call for the detainees' immediate release.
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) December 26, 2024
As we were about to board our flight from Sana’a, about two hours ago, the airport… pic.twitter.com/riZayWHkvf