शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या आखाती देशात जगातील सर्वात स्वस्त दरात पेट्रोल मिळते?; किंमत इतकी की वडापावही महाग वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:42 IST

कमी किंमतीच्या कारणाने शेजारील देशांमध्ये पेट्रोलची तस्करी वाढली आहे. ती थांबवण्यासाठी सरकारने कोटा सिस्टम लागू केले आहे

मध्य पूर्वेत इराण इस्रायल युद्धामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या युद्धामुळे जगावर तेल संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली आहे. ज्या आखाती देशांमध्ये हे युद्ध आहे तिथे तेलाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. आज जगातील अनेक देशात इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. परंतु काही देशात आजही इंधनाची किंमत इतकी कमी आहे की ती वाचून तुम्हालाही विश्वास बसणे कठीण होईल. एक लीटर पेट्रोलची किंमत एका माचिसच्या डब्याएवढी असू शकते याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. विशेषत: आखाती देशांमध्ये तेथील सरकार आपल्या नागरिकांना भरपूर अनुदान देते. जगातील इतर देश आणि आखाती देशांमधील पेट्रोलच्या किंमतीचे गणित समजून घेऊया. 

जगात सर्वात स्वस्त पेट्रोल

इंधनाच्या किंमतीचा थेट परिणाम कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्यांच्या खिशावर पडतो. जिथे भारतासारख्या देशात पेट्रोलची किंमत १०० रूपयांच्या आसपास आहे. तिथेच जगाच्या काही देशात पेट्रोलची किंमत फक्त २ ते ३ रूपये लीटर अथवा त्याहून कमी आहे. जगात सर्वात स्वस्त पेट्रोल देणाऱ्या देशांमध्ये सध्या इराण टॉपला आहे. इराणमध्ये पेट्रोलची किंमत २.५० ते ३ रूपये प्रति लीटर इतकी आहे. इतक्या कमी किंमतीमागे इराण सरकारची मजबूत सब्सिडी पॉलिसी आहे. इराणसाठी वरदानासह एक समस्याही बनली आहे. कमी किंमतीच्या कारणाने शेजारील देशांमध्ये पेट्रोलची तस्करी वाढली आहे. ती थांबवण्यासाठी सरकारने कोटा सिस्टम लागू केले आहे. ज्यातून महिन्याला १६० लीटर हून अधिक पेट्रोल जमा करणाऱ्यांना खूप महाग किंमत मोजावी लागेल. 

लिबियात तेलाचे दर किती?

जगात दुसऱ्या नंबरवर लिबियाचे नाव येते. उत्तर आफ्रिका आणि अरब लीगचा सदस्य असल्याने लिबियात सरासरी २.६४ रूपये प्रति लीटर पेट्रोल विक्री होते. तेल संपत्तीने समृद्ध हा देश आपल्या नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी जागतिक स्तरावर सर्वात स्वस्त इंधन उपलब्ध करून देते. एकेकाळी व्हेनेझुएला जगात सर्वात स्वस्त पेट्रोल देणारा देश होता परंतु आता हा देश तिसऱ्या नंबरवर आहे. इथे ३ रुपये प्रति लीटर दराने पेट्रोल विक्री होते. व्हेनेझुएला येथेही कोटा सिस्टम लागू आहे ज्यात महिन्याच्या सुरुवातीला १२० लीटरवर सब्सिडी दिली जाते. जर एखादा नागरिक त्याहून अधिक पेट्रोल घेत असेल तर त्याला ४० रूपये प्रति लीटर मोजावे लागू शकतात.

आखाती देशातील पेट्रोलचे दर किती?

गल्फ सहयोग परिषदेतील देशांबाबत बोलायचे तर कुवेत या भागात सर्वात स्वस्त पेट्रोल देणारा देश आहे. कुवेतमध्ये पेट्रोलची किंमत जवळपास २९ ते ३० रूपये लीटर आहे. 

इराक - २९ ते ३० रूपये लीटरबहरीन - ३१ ते ३२ रूपये लीटरकतार  - ४८ ते ४९ रूपये लीटरसौदी अरेबिया - ५० ते ५१ रूपये लीटरओमान - ५३ ते ५४ रूपये लीटर

भारत आणि शेजारील देशात काय स्थिती?

जागतिक यादीत भारत ७३ व्या स्थानी येतो. भारतात विविध राज्यात पेट्रोलचे दर वेगळे आहेत. ९४ ते १०५ रूपये लीटर दर आकारले जातात. त्या तुलनेत पाकिस्तानात पेट्रोल खूप स्वस्त आहे. पाकिस्तानात ८० ते ८४ रूपये लीटर पेट्रोल विक्री होते. आफ्रिकन देश अंगोला येथेही इंधन स्वस्त दरात विकले जाते. तिथे २७ रूपये प्रति लीटर दर आहेत. पेट्रोलच्या दरात इतके अंतर असण्यामागे २ कारणे आहेत. त्यात कररचना आणि कच्चे तेल उत्पादन क्षमता यांचा समावेश आहे. भारत आपल्या गरजेसाठी ८० टक्क्याहून अधिक तेल आयात करते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Cheapest Petrol Globally: Gulf Nation Prices Lower Than a Snack!

Web Summary : Amidst global fuel price hikes, Iran offers the cheapest petrol at ₹2.50-₹3 per liter due to subsidies. Libya, Venezuela, and Kuwait also have low prices. Indian petrol costs ₹94-₹105, while Pakistan's is cheaper. Tax and oil production affect prices.
टॅग्स :Petrolपेट्रोलIranइराणIndiaभारत