Crude Oil : इराण विरोधात इस्त्राइल आणि अमेरिकेने पुकारलेल्या युद्धानंतर जगभरातील लोकांच्या नजरा तेलाच्या सप्लायवर लागलेल्या आहेत. इराणवर झालेल्या हल्ल्यामुळे अनेक देशांवर तेलाचं संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतही ८५ टक्के तेल बाहेरून मागवतो. पण आपल्याला माहीत आहे का की, जगातील असा कोणता देश आहे जो तेल मार्केट आपल्या इशाऱ्यावर चालवतो? आणि जगातील असा कोणता देश आहे जिथे कच्चं तेल स्वस्त दरात विकलं जात आहे? चला जाणून घेऊया तेलाचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळ कसा असतो.
तेल मार्केटचा राजा कोण?
कच्च्या तेलाचं उत्पादन करण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका सध्या पहिल्या नंबरवर आहे. एका आकडेवारीनुसार अमेरिका आपल्या आधुनिक शेल टेक्नीकच्या जोरावर जगातील सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश आहे. त्यानंतर नंबर लागतो तो सौदी अरेबिया आणि त्यानंतर रशियाचा. हे तीन देश मिळून एकूण तेल उत्पादनाचा एक मोठा भाग कंट्रोल करतात. दुसरीकडे सौदी अरेबिया आजही तेल निर्यात करण्यात पहिल्या नंबरवर आहे. कारण त्यांच्याकडे तेलाचा वापर तेवढा नाही. ते जगातील कानाकोपऱ्यात कच्चं तेल पाठवतात. त्याशिवाय इराक, कॅनडा, यूएई, कुवैत, नॉर्वे, नायजेरिया आणि ब्राझील हे देश सुद्धा मोठ्या प्रमाणात तेल निर्यात करतात.
कुठे मिळतं सगळ्यात स्वस्त पेट्रोल आणि कच्चं तेल?
जगात सगळ्यात स्वस्त पेट्रोल त्या देशांमध्ये मिळतं, ज्यांच्याकडे तेलाचा मोठा साठा आहे आणि ज्या देशातील सरकार मोठी सब्सिडी देतात. मार्च २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, लीबिया जगातील सगळ्यात स्वस्त पेट्रोल आणि कच्चं तेल विकणारा देश आहे. इथे पेट्रोलची किंमत केवळ ०.००२४ डॉलर (भारतीय करन्सीत साधारण २.१५ रूपये) प्रति लीटर आहे. त्यानंतर इराण आणि व्हेनिजुएलाचा नंबर लागतो. इथे पेट्रोलची किंमत २.५० ते ३ रूपये प्रति लीटरच्या जवळपास आहे. कुवैत आणि अंगोलासारख्या देशात पेट्रोल ३० रूपये प्रति लीटरपेक्षा कमी दरात मिळतं.
भारत कुणाकडून घेतो तेल?
भारताचा नेहमीच हा प्रयत्न राहिला आहे की, कोणत्याही एका देशावर अवलंबून न राहता, रशिया, मिडल ईस्ट आणि अमेरिकासारख्या वेगवेगळ्या देशातून तेल खरेदी करावं. जेणेकरून यु्द्धासारख्या स्थितीत सप्लाय बंद पडू नये. सध्या भारत रशियाकडून सगळ्यात जास्त तेल खरेदी करतो. भारत आपल्या एकूण गरजेच्या जवळपास २० ते २५ टक्के तेल रशियाकडून घेतो.
कच्च्या तेलाच्या उत्पादनाचं गणित
प्रत्येक देशात कच्चं तेल काढण्याचा खर्च वेगवेगळे असतो. सौदी अरब आणि कुवैतसारख्या खाडी देशांमध्ये तेल काढणं स्वस्त पडतं. इथे तेल जमिनीत फार खोल नाही. विहिरी फार समृद्ध आहेत. इथे एक बॅरल तेल काढण्यासाठी १० डॉलरपेक्षाही कमी खर्च येतो. याउलट अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमध्ये तेल जमिनीच्या खूप खोलवर आहे. शेल टेक्निकच्या माध्यमातून तेल काढण्यासाठी ३० ते ४० रूपये डॉलर इतका खर्च येतो. हेच कारण आहे की, बाजारात जेव्हा तेलाच्या किंमती पडतात, तेव्हा खाडी देश सगळ्यात जास्त फायद्यात राहतात.
Web Summary : US leads crude oil production, Saudi Arabia in exports. Libya offers cheapest oil at $0.0024/liter. India diversifies oil sources, relying heavily on Russia. Extraction costs vary, benefiting Gulf nations.
Web Summary : अमेरिका कच्चे तेल के उत्पादन में अग्रणी, सऊदी अरब निर्यात में। लीबिया में सबसे सस्ता तेल $0.0024/लीटर। भारत रूस पर निर्भर रहते हुए तेल स्रोतों में विविधता लाता है। खाड़ी देशों को लाभ।