शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनच्या 'ऑपरेशन स्पायडरवेब'ला कधी अन् कसं प्रत्युत्तर देणार?; रशियाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 19:04 IST

मागील आठवड्यात युक्रेनने ऑपरेशन स्पायडरवेब हाती घेत रशियाविरोधात मोठा ड्रोन हल्ला केला.

नुकतेच ऑपरेशन स्पायडरवेब अंतर्गत युक्रेनने रशियाच्या एअरबेसला टार्गेट केले. या हल्ल्यात रशियाच्या ४० लढाऊ विमानांचे मोठे नुकसान झाले. गेल्या ३ वर्षातील रशिया-युक्रेन युद्धात रशियावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यानंतर रशिया-युक्रेन यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. त्यात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यासोबत जवळपास ७५ मिनिटे चर्चा केली. रशियाने युक्रेनच्या हल्ल्याला कसं उत्तर द्यायचे आणि कधी द्यायचे हे त्यांचे सैन्य ठरवेल असं स्पष्ट सांगितले आहे.

मागील आठवड्यात युक्रेनने ऑपरेशन स्पायडरवेब हाती घेत रशियाविरोधात मोठा ड्रोन हल्ला केला. त्या ऑपरेशनमध्ये रशियन सैन्याचे एअरबेस आणि विमानांना टार्गेट करण्यात आले होते. बुधवारी डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादीमीर पुतिन यांच्यात फोनवरून संवाद झाला. त्यात रशियाने स्पष्ट सांगितले की, रशिया युक्रेनच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीही सोशल मीडियावर पुतिन यांच्याशी झालेल्या संवादात हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगितले आहे. 

संवाद चांगला झाला, पण...

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, पुतिन यांच्यासोबत जवळपास १ तास १५ मिनिटे चर्चा झाली. आम्ही युक्रेनकडून रशियाच्या एअरबेसवर केलेला हल्ला, दोन्ही बाजूने सुरू असलेले विविध हल्ले यांच्यावर चर्चा केली. ही एक चांगली चर्चा झाली परंतु ज्यातून शांतता निर्माण होईल असं काही चर्चा नाही. एअरबेसवर झालेल्या अलिकडच्या हल्ल्यांना रशियाला प्रत्युत्तर द्यावे लागेल असं राष्ट्रपती पुतिन यांनी सांगितल्याचे ट्रम्प म्हणाले. 

'ऑपरेशन स्पायडरवेब'वर रशिया काय बोलले?

दरम्यान, आमच्या सैन्याला योग्य वाटेल तेव्हा हा हल्ला केला जाईल असं रशियाने सांगितले. रशियासोबत युद्धावेळा युक्रेनकडून ऑपरेशन स्पायडरवेब करत ड्रोन हल्ले करण्यात आले. १ जून रोजी मोठ्या संख्येने ड्रोन हल्ले केल्याचे युक्रेनने कबुल केले. रशियात केलेल्या या ड्रोन हल्ल्यात प्रमुख एअरबेस आणि विमानांना टार्गेट करण्यात आले. हल्ल्यात ४० हून अधिक विमाने जळून खाक झाली ज्याचा वापर युक्रेनविरोधात हल्ल्यासाठी केला जात होता.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प