शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव यांच्या अधिकारांचं रक्षण करणारा 'व्हिएन्ना करार' नेमका आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 19:45 IST

कुलभूषण जाधव प्रकरणाता भारताला विएन्ना कराराचा मोठा फायदा झाला.

ठळक मुद्देकुलभूषण जाधव प्रकरणाता भारताला विएन्ना कराराचा मोठा फायदा झाला. आधुनिक आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेला व्हिएन्ना करार 1961 साली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे करण्यात आला.

नवी दिल्ली - कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयानेभारताच्या बाजुने निकाल दिला आहे. भारताच्या बाजुने 15 न्यायाधीशांनी आपले मतदान केले तर एका न्यायाधीशांनी पाकिस्तानच्या बाजुने मतदान केले. त्यामुळे याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत जिंकला असून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडला आहे. या निकालानुसार कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. 

कुलभूषण जाधव प्रकरणाता भारताला विएन्ना कराराचा मोठा फायदा झाला. भारताची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकिल हरिश साळवे यांनी व्हिएन्ना कराराचा मुद्दा लावून धरला. या कायद्यानुसार कुलभूषण यांना राजकीय मदत मिळायला हवी होती, असे सांगत हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला खडसावले. तसेच, कुलभूषण यांच्या फाशीला स्थगितीही दिली आहे.    

व्हिएन्ना करार नेमका काय ?

आधुनिक आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेला व्हिएन्ना करार 1961 साली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे करण्यात आला. या करारानुसार एका देशाचे राजदूत दुसऱ्या देशात कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि भीतीशिवाय काम करू शकतात. याअंतर्गत राजदुतांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार, राजदुतांवर परदेशात गुन्हा दाखल होऊ शकत नाही. 2018 पर्यंत 192 देशांनी या कराराला मान्यता दिली आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वच देशांना परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण व सौहार्दचे संबंध प्रस्थापित करावेत, असे वाटू लागले. त्यामुळे सर्वच राष्ट्रांनी आप-आपले राजदूत दुसऱ्या देशात कायमस्वरुपी ठेवण्याची गरज होती. त्यासाठी काही विशेष कायदे आणि नियमावली आखणे गरजेचे होते. त्यातून ऑस्ट्रेयाची राजधानी व्हिएन्नामध्ये 18 एप्रिल 1961 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय कायदेमंडळाने याबाबतच्या तरतुदी प्रत्यक्षात आणल्या होत्या. एकूण 52 कलमी हा करार असून राजनैतिक अधिकाऱ्यांच्या अधिकाराची आणि सवलतींची माहिती या करारात नमूद करण्यात आली आहे. 15 ऑक्टोबर 1965 साली भारताने या कराराला संमती दिली.  

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवCourtन्यायालयIndiaभारतTerror Attackदहशतवादी हल्ला