What should the injured person do while applying for unites states business tourist B1 B2 visa | दुखापतग्रस्त व्यक्तीने अमेरिकेच्या B1/B2 व्हिसाच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहणं गरजेचं असतं का?
दुखापतग्रस्त व्यक्तीने अमेरिकेच्या B1/B2 व्हिसाच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहणं गरजेचं असतं का?

प्रश्न- माझे वडील बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसासाठी अर्ज करणार आहेत. त्यांच्या पायाला इजा झाली असून ते आधाराशिवाय चालू शकत नाहीत. त्यांना दुतावासातील मुलाखतीला हजर राहावे लागेल का?

उत्तर- होय, बऱ्याचदा व्हिसा मुलाखत आवश्यक असते. तुमच्या वडिलांना दुतावासातील मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल. त्यांचं वय 79 पेक्षा जास्त असल्यास किंवा त्यांच्या बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसाची मुदत संपून 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधी झाला असल्यास त्यांना सवलत मिळू शकते.

काही अर्जदारांना मुलाखतीवेळी मदतीची गरज लागू शकते याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे दुतावासातील कर्मचारी तुमच्या वडिलांना मुलाखती दरम्यान त्यांच्या सोबत एक व्यक्ती ठेवण्याची परवानगी देतील. त्या व्यक्तीने स्वतः सोबत सरकारकडून देण्यात आलेलं ओळखपत्र आणावं.

तुमच्या वडिलांना चालताना त्रास होत असल्यास ते किंवा त्यांच्या सोबत असलेली व्यक्ती दुतावासातील कर्मचाऱ्यांकडे व्हीलचेअरसाठी विनंती करू शकतात. दुतावासात व्हीलचेअर उपलब्ध असते.

तुमचे वडील वैध असलेल्या B1/B2 व्हिसाचं नूतनीकरण करत असल्यास किंवा त्यांच्या व्हिसाची मुदत संपून वर्षभरापेक्षा जास्त कालावधी न झाला असल्यास किंवा तुमच्या वडिलांचं वय 79 वर्षांपेक्षा जास्त असल्यास त्यांना मुलाखतीमधून सवलत मिळू शकते. मुलाखतीमधून सूट मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेच्या अटींची माहिती  http://cdn.ustraveldocs.com/in/in-niv-visarenew.asp वर उपलब्ध आहे. तुमचे वडील यासाठी पात्र ठरत असल्यास ते व्हिसा अर्ज केंद्रावर ड्रॉप-ऑफ अपॉइंटमेंटसाठी वेळ निश्चित करू शकतात. अपॉइंटमेंट घेतल्यावर वडील किंवा त्यांच्या वतीनं एखादी व्यक्ती त्यांचा पासपोर्ट आणि आवश्यक कागदपत्रं जमा करू शकते.

Web Title: What should the injured person do while applying for unites states business tourist B1 B2 visa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.