US Visa: इमिग्रेशन आणि नॅशनलिटी कायद्याखाली प्रकरण नाकारलं गेल्यास काय करावं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 04:28 PM2021-01-09T16:28:04+5:302021-01-09T16:28:30+5:30

US Visa: नॉन-इमिग्रंट व्हिसा आणि इमिग्रंट व्हिसासाठी असणाऱ्या पद्धती वेगवेगळ्या आहेत

What should I do if my case has been refused under section 221 g of the Immigration and Nationality Act | US Visa: इमिग्रेशन आणि नॅशनलिटी कायद्याखाली प्रकरण नाकारलं गेल्यास काय करावं? 

US Visa: इमिग्रेशन आणि नॅशनलिटी कायद्याखाली प्रकरण नाकारलं गेल्यास काय करावं? 

Next

प्रश्न: इमिग्रेशन आणि नॅशनलिटी कायद्याच्या कलम २२१ (जी) अंतर्गत माझी तक्रार नाकारली गेल्यास मी काय करावं? मी माझी शिल्लक कागदपत्रं जोडू शकतो का?

उत्तर: नॉन-इमिग्रंट व्हिसा आणि इमिग्रंट व्हिसासाठी असणाऱ्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कलम २२१ (जी) अंतर्गत तुमची तक्रार ऐकली न गेल्यास खालील सूचनांचा अवलंब करा.

नॉन इमिग्रंट व्हिसासाठी-
मुलाखतीवेळी तुम्हाला देण्यात आलेल्या २२१ जी नकार पत्रावर देण्यात आलेल्या सूचनांचं अनुसरण करा. तुम्हाला कागदपत्रं जमा करायची असल्यास तुम्ही ती व्हिसा अर्ज केंद्रात जाऊन जमा करू शकता. त्यासाठी तुम्हाला नवीन अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही. याशिवाय कागदपत्रं जमा करताना कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. अतिरिक्त कागदपत्रं हवी असल्यास किंवा फॉलो-अप मुलाखत घ्यायची असल्यास आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.

इमिग्रंट व्हिसासाठी- 
संसाधनांची कमतरता आणि स्थानिक परिस्थिती यांच्यामुळे आम्ही सध्या इमिग्रेशन आणि नॅशनल ऍक्टच्या २२१ (जी) अंतर्गत नाकारल्या जाणाऱ्या आयआर १/२, सीआर १/२ आणि के १ प्रकरणांवरच काम करत आहोत. अशा प्रकरणांमध्ये मुलाखतीवेळी अधिकाऱ्यानं दिलेल्या २२१ जी नकार पत्रातील सुचनांचं अनुसरण करा. तुम्हाला काही कागदपत्रं जमा करायची असल्यास त्यासाठी https://www.ustraveldocs.com/in/ वर जाऊन २२१ जी अपॉईंटमेंट घ्यावी लागेल. संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही ११ पैकी एका ड्रॉप-ऑफ लोकेशनसह तारीख आणि वेळ निश्चित करू शकता. आम्हाला तुमची कागदपत्रं आधीच मिळाली असल्यास किंवा कागदपत्रांची आवश्यकता नसल्यास कोणत्याही कृतीची गरज नाही. व्हिसा अर्ज केंद्राची २२१ जी अपॉईंटमेंट घेतल्याशिवाय तुम्ही कागदपत्रं जमा करू शकत नाही, ही बाब ध्यानात ठेवा.

नवी दिल्ली आणि मुंबई अमेरिकेच्या दूतावासात सध्या नियमित इमिग्रंट व्हिसा सेवा सध्या सुरू नाहीत. नवी दिल्लीतील अमेरिकेन दूतावास आयएच-३ ऍडॉप्शन व्हिसावर काम करत आहे.

तुम्हाला व्हिसाबद्दल काही प्रश्न असल्यास तुम्ही support-india@ustraveldocs.com वर मेल करू शकता.


सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकतात.
फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.
 

Web Title: What should I do if my case has been refused under section 221 g of the Immigration and Nationality Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.