9/11 Terror Attack: अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ल्यात सौदी अरबची काय भूमिका? FBI चा सीक्रेट अहवाल उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 11:09 AM2021-09-12T11:09:44+5:302021-09-12T11:17:02+5:30

दहशतवादी हल्ल्याला २० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही कागदपत्रे उघड करण्यात आली आहेत. अनेक वर्षापासून लोकांपासून लपवून ठेवलेल्या गोष्टी समोर आणाव्यात यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आदेश दिले आहेत.

What is the role of Saudi Arabia in 9/11 America terrorist attacks in US? FBI Secret Report Revealed | 9/11 Terror Attack: अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ल्यात सौदी अरबची काय भूमिका? FBI चा सीक्रेट अहवाल उघड

9/11 Terror Attack: अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ल्यात सौदी अरबची काय भूमिका? FBI चा सीक्रेट अहवाल उघड

googlenewsNext
ठळक मुद्देअलीकडच्या काही आठवड्यात पीडित कुटुंबांनी ज्यो बायडन यांच्यावर दबाव बनवला होता. 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप सौदी सरकारनं वारंवार फेटाळून लावला आहेजारी केलेल्या संशोधित रेकॉर्डसमध्ये एका व्यक्तीसोबत २०१५ मध्ये झालेल्या मुलाखतीचा उल्लेख आहे.

वॉश्गिंटन – अमेरिकेवर झालेल्या 9/11 दहशतवादी हल्ल्याला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यात जवळपास ३ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याशी निगडीत १६ पानांचे सीक्रेट कागदपत्रं FBI नं शनिवारी जारी केली. ही कागदपत्रे ११ सप्टेंबर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन सौदी हायजँकर्सला दिलेल्या लॉजिस्टिकल सपोर्टबद्दल आहे. कागदपत्रात अमेरिकेत दोन सौदी सहकाऱ्यांसोबत अपहरणकर्त्यांचा संपर्क असल्याचं सांगण्यात आलं. परंतु यात सौदी सरकारचा सहभाग होता असा कुठलाही पुरावा सापडला नाही.

दहशतवादी हल्ल्याला २० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही कागदपत्रे उघड करण्यात आली आहेत. अनेक वर्षापासून लोकांपासून लपवून ठेवलेल्या गोष्टी समोर आणाव्यात यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आदेश दिले आहेत. अलीकडच्या काही आठवड्यात पीडित कुटुंबांनी ज्यो बायडन यांच्यावर दबाव बनवला होता. न्यूयॉर्कमध्ये सुरु असलेल्या खटल्याचा रेकॉर्ड मागितला होता. हल्ल्यात सौदीचे काही वरिष्ठ अधिकारीही सहभागी होते असा दावा करण्यात आला होता.

9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप सौदी सरकारनं वारंवार फेटाळून लावला आहे. वॉश्गिंटन येथील सौदी दूतावासाने सांगितले की, सौदी देशाविरोधात होत असलेल्या खोट्या आरोपातून मुक्त होण्यासाठी सर्व रेकॉर्डस लोकांसमोर उघड करावेत असं म्हटलं आहे. सौदी अरबचा अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्याशी काही देणं घेणं नाही. होणारे आरोप हे चुकीचे आहे असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले आहे.

बायडन यांनी मागील आठवड्यात न्याय विभाग आणि अन्य एजेन्सीना तपासातील कागदपत्रे डीक्लासिफिकेशन आढावा करुन सहा महिन्यात ते समोर आणावेत असा आदेश दिला आहे. न्यूयॉर्क, पेनसिल्वेनिया आणि उत्तरी वर्जीनियामध्ये ११ सप्टेंबरला स्मारक कार्यक्रमात बायडन यांनी भाग घेतल्यानंतर काही तासात शनिवारी रात्री १६ पानं रेकॉर्ड जारी करण्यात आला. पीडित कुटुंबाने औपचारिक कार्यक्रमात बायडन यांच्या उपस्थितीला विरोध केला होता आणि लवकरात लवकर कागदपत्रे समोर आणावीत अशी मागणी केली होती.

जारी केलेल्या संशोधित रेकॉर्डसमध्ये एका व्यक्तीसोबत २०१५ मध्ये झालेल्या मुलाखतीचा उल्लेख आहे. जो अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी अर्ज देतो. अनेक वर्षापूर्वी त्याने सौदी अरबच्या नागरिकांशी वारंवार संपर्क साधला होता. त्यानंतर तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की, विमान अपहरणकर्त्यांना सौदीतील काहींनी महत्त्वपूर्ण लॉजिस्टिकल सपोर्ट हल्ल्याच्या वेळी दिला होता.

Web Title: What is the role of Saudi Arabia in 9/11 America terrorist attacks in US? FBI Secret Report Revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.