या ऑफिसमध्ये बॉसला किस करण्याची सक्ती

By Admin | Updated: October 11, 2016 14:44 IST2016-10-11T14:44:17+5:302016-10-11T14:44:17+5:30

चीनमधील एका कंपनीत सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर महिला कर्मचा-यांना सर्वात प्रथम बॉसला किस करावा लागतो

What is Boss doing in this office? | या ऑफिसमध्ये बॉसला किस करण्याची सक्ती

या ऑफिसमध्ये बॉसला किस करण्याची सक्ती

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 11 - ऑफिसमध्ये आल्यावर बॉसला चुंबन देण्याची सक्ती असेल तर....असं कुठे असतं का असा विचार करत असाल तर हे वाचा. चीनमधील एका कंपनीत सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर महिला कर्मचा-यांना सर्वात प्रथम बॉसला किस करावा लागतो. यासाठी त्यांची इच्छा आहे की नाही ? हा प्रश्नच नाही कारण त्याची सक्तीच आहे. बीजिंगमधील ही कंपनी आहे जिथे हा प्रकार चालतो. 
 
दर सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर सर्वप्रथम महिला कर्मचा-यांना बॉसला चुंबन देण्यासाठी रांग लावावी लागते. या ऑफिसमध्ये अर्धाहून जास्त कर्मचारी महिला आहेत. यामुळे महिला कर्मचा-यांशी मैत्री होण्यास तसंच नातं घट्ट होण्यास मदत होते, त्यामुळे ही पद्धत सुरु केल्याचं या कंपनीच्या बॉसचं म्हणणं आहे. यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. कंपनीतील सर्वच कर्मचा-यांना हा प्रकार आवडतो असं नाही, पण याची सक्ती केली जात असल्याचं समोर आलं आहे. दोन महिला कर्मचा-यांनी नकार दिल्यानंतर त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं. 
 

Web Title: What is Boss doing in this office?