अमेरिकेला संबोधित करताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बेचिराख करण्याची भाषा केली. ट्रम्प यांच्या या धमकीनंतर इराणनेहीयुद्धातून माघार घेणार नसल्याचे सांगत दंड थोपटले आहे. अमेरिकेची जगात नाचक्की होत नाही आणि शरण येत नाही, तोपर्यंत युद्ध सुरूच राहणार, असा इशारा इराणने दिला आहे.
इराणच्या लष्कराने म्हणजे आयआरजीसीने गुरुवारी (२ एप्रिल) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानाला कडाडून प्रत्युत्तर दिले आहे. जोपर्यंत वॉशिंग्टनला (अमेरिका) कायमची नामुष्की, पश्चाताप आणि शरणागती पत्करावी लागत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असे म्हटले. इराणच्या सरकारी माध्यम संस्था असलेल्या 'प्रेस टीव्ही'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अमेरिकेला आमच्या लष्करी शक्तीबद्दल काहीच माहिती नाही
ट्रम्प यांनी इराणच्या नौदल, लष्कराचे प्रचंड नुकसान केल्याचा दावा केला. इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांचे आणि शस्त्र भंडाराचे नुकसान केल्याचा अमेरिकेचा दावा 'खतम अल-अंबिया' सेंट्रल हेडक्वार्टरच्या प्रवक्त्याने फेटाळला. सेंट्रल हेडक्वार्टर हे सैन्य आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) यांच्यातील समन्वयातील सर्वोच्च केंद्र आहे. इराणच्या लष्करी ताकदीबद्दल अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना फार माहिती नाही, असे इराणने म्हटले आहे.
आयआरजीसीने पुढे म्हटले आहे की, "आमच्या लष्करी सामर्थ्याबद्दल आणि मिसाईल्स, ड्रोन्स आणि शस्त्र साठ्याबद्दल तुमच्याकडे असलेली माहिती अपूर्ण आहे. तुम्हाला आमच्या अफाट रणनीती क्षमतेबद्दल काहीही माहिती नाही."
भ्रम बाळगू नका, तुमचा पाय खोलात, आरआयजीसीने काय म्हटले?
"आम्ही आमची स्ट्रेटजिक क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रे, लांब पल्ल्यांची आणि अचूक मारा करणारी ड्रोन्स, आधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक युद्ध किंवा विशेष शस्त्रे गमावली आहेत, असा भ्रम बाळगू नका. असे समजूनच तुम्ही ज्या गाळात अडकला आहात. तो समज ठेवला तर तुम्ही अधिक खोलात जाल", असा इशारा इराणने दिला आहे.
"आमच्या मुस्लिम राष्ट्राविरुद्ध तुम्ही जे आक्रमण सुरू केले आहे, त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. जोपर्यंत तुमची कायमची नाचक्की होत नाही आणि तुम्हाला शरणागती पत्करावी लागत नाही, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहील. तुम्हाला याआधी मिळालेल्या जोरदार धक्क्यांनंतर आता आमच्याकडून आणखी विध्वंसक हल्ल्यांची अपेक्षा ठेवा," असेही आयआरजीसीच्या प्रवक्त्याने ट्रम्प यांना उत्तर देताना म्हटले आहे.
Web Summary : Iran vows to continue fighting until the US is humiliated and surrenders. They dismissed Trump's claims of military damage, asserting hidden strengths and warning of further attacks. Iran says US assessment of their capabilities is incomplete.
Web Summary : ईरान ने अमेरिका के अपमानित होकर हार मानने तक युद्ध जारी रखने की कसम खाई। उन्होंने ट्रम्प के सैन्य नुकसान के दावों को खारिज कर दिया, छिपी हुई ताकत का दावा किया और आगे के हमलों की चेतावनी दी। ईरान का कहना है कि अमेरिका का आकलन अधूरा है।