अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात जबरदस्त युद्ध पेटले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी बुधवारी इराणला उघड धमकी दिली आहे. इराणचा नवा 'सुप्रीम लीडर'ही (सर्वोच्च नेता) आमच्या निशाण्यावर असेल, असे काट्झ यांनी म्हटले आहे. दिवंगत अली खामेनी यांच्यानंतर त्यांचा मुलगा मुज्तबा खामेनेईची इराणचा सर्वोच्च नेता म्हणून निवड करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. " इराणमध्ये नियुक्त झालेल्या कोणत्याही नवीन नेत्याला जो आपला देश नष्ट करण्याच्या योजना पुढे नेईल त्याला थेट लक्ष्य केले जाईल. त्यांनी सांगितले की, त्याचे नाव काय आहे किंवा तो कुठे लपला आहे याने काही फरक पडत नाही."
अशी आहे अमेरिका-इस्रायलची रणनीती -संरक्षण मंत्री काट्झ म्हणाले, इस्रायल आपल्या अमेरिकन मित्रराष्ट्रांसोबत मिळून इराणी राजवट पूर्णपणे नष्ट करेल. इराणमधील जनतेनेच या राजवटीला उखाडून फेकावे, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 'असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स'ने मुज्तबा खामेनी यांची निवड केल्याची चर्चा असतानाच आलेले हे विधान थेट इशारा मानला जात आहे.
युद्धाचा पाचवा दिवस आणि भीषण हानी -अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील हे युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिकेकडूनही एकमेकांवर जबरदस्त हल्ले सुरू आहेत. बुधवारी पहाटे तेहरानमध्ये प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध आणखी काही आठवडे चालण्याचे संकेत दिले आहेत. या संघर्षात आतापर्यंत इराणच्या सुमारे ८०० जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने इराणचे क्षेपणास्त्र तळ आणि अणुसंशोधन केंद्रांना लक्ष्य केले असून, प्रत्युत्तर म्हणून इराणनेही अमेरिकन दूतावास आणि ऊर्जा पुरवठा केंद्रांवर हल्ले केले आहेत. या वाढत्या तणावामुळे संपूर्ण पश्चिम आशियात अस्थिरता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.
Web Summary : Israel threatens to target Iran's new Supreme Leader amid escalating US-Iran tensions. Strikes on Tehran and retaliatory attacks have intensified, causing instability. Israel, with US support, aims to dismantle the Iranian regime, urging internal revolt. Conflict's fifth day sees significant casualties and heightened regional fears.
Web Summary : इज़राइल ने ईरान के नए सुप्रीम लीडर को निशाना बनाने की धमकी दी है। अमेरिका-ईरान तनाव बढ़ रहा है। तेहरान पर हमले और जवाबी कार्रवाई से अस्थिरता बढ़ गई है। इज़राइल, अमेरिकी समर्थन के साथ, ईरानी शासन को उखाड़ फेंकने का लक्ष्य रखता है। संघर्ष के पाँचवें दिन भारी नुकसान हुआ है।