भूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केले नाही, चीनचा दावा

By Admin | Updated: June 29, 2017 23:12 IST2017-06-29T23:12:24+5:302017-06-29T23:12:55+5:30

भूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केलेले नाही, असे चीनने गुरुवारी म्हटले.

We have not violated Bhutan's limits, China claims | भूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केले नाही, चीनचा दावा

भूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केले नाही, चीनचा दावा

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 29 - भूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केलेले नाही, असे चीनने गुरुवारी म्हटले. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) आमच्या सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप भूतानने केला होता. आमचे सैन्य ‘चीनच्या भूभागातच’ तैनात असून भारताने ‘स्वत:च्या चुका’ दुरुस्त करून घ्याव्यात, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले.

चीनच्या सैनिकांनी भुतानच्या भूभागात प्रवेश केल्याचे तुमचे म्हणणे मला दुरुस्त करायचे आहे. चीनचे सैनिक चीनच्याच भूभागात तैनात आहेत, असे हा प्रवक्ता प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला. भारताच्या सैनिकांनी सिक्कीम सेक्टरमधील डोंगलोंग भागातील चीनच्या बाजूकडून प्रवेश केल्याचा आरोपही त्याने केला. भारतीय जवानांनी नित्याची कामे थांबवण्याचा प्रयत्न केला. चीनने स्वायत्तता सुरक्षित राखणे आणि भूभागाची एकात्मता जपण्यासाठी या कामांना योग्य तो प्रतिसाद दिला, असेही त्याने म्हटले. भारताने केलेल्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करून घ्याव्यात आणि चीनच्या भूभागातून सगळ्या सैनिकांना काढून घ्यावे, असे आम्ही स्पष्ट केले आहे, असे प्रवक्ता म्हणाला.

भूतानने त्याच्या डोंगलांगमधील झोंपलरी भागात असलेल्या लष्करी छावणीकडे चीन बांधत असलेल्या रस्त्याला बुधवारी आक्षेप घेत बांधकाम थांबवून तत्काळ पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण करण्यास सांगितले होते. भूतानने हा आक्षेप येथील दूतावासामार्फत घेतला होता. डोंगलांग भागातील झोंपलरी येथील भूतानच्या लष्करी छावणीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम चीनच्या लष्कराने नुकतेच सुरू केले व त्यामुळे दोन देशांतील (चीन व भूतान) कराराचे उल्लंघन होते, असे भूतानचे भारतातील राजदूत वेटसोप नामग्याल यांनी नवी दिल्लीत म्हटले होते. डोंगलांग हा चुम्बी खोऱ्यानजीक तीन सीमा एकत्र येणारा भाग असून तो चीनच्या नियंत्रणात आहे. भूतानने त्या भागावर हक्क सांगितलेला आहे.

Web Title: We have not violated Bhutan's limits, China claims